पुणे-नाशिक रेल्वेसाठी भूसंपादनाचे शेतकऱ्यांना अधिक दर : गंगाथरण डी.

नाशिक : पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना नकाशा पाहताना जिल्हाधिकारी गंगाथरण डी
नाशिक : पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना नकाशा पाहताना जिल्हाधिकारी गंगाथरण डीesakal

नाशिक : पुणे-नाशिक (Pune - Nashik) दुहेरी मध्यम-उच्च वेगवान ब्रॉडगेड रेल्वे मार्गासाठी जिल्हा समितीने जाहीर केलेले ८ गावातील भूसंपादनाचे दर कायदेशीरदृष्ट्या आणि नियमाने अधिक देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (Collector Gangatharan d.) यांनी आज सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिली. (land acquisition higher rates in 8 villages for Pune-Nashik Railway)

भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात येणार...

जिल्हाधिकाऱ्यांनी बारागावपिंप्री, वडझिरे, पाटपिंप्री या गावांना भेट दिली. पुढील पाच महिन्यात सक्तीने भूसंपादन कायद्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रवाश्‍यांची संख्या आणि वाहतूक कमी होणार

सध्यस्थितीत शेतकऱ्यांनी हिताचा विचार करुन प्रकल्पास संमतीने जमीन हस्तांतरणास-खरेदीस सहभाग द्यावा, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या रेल्वेमार्गामुळे रस्त्यावरील प्रवाश्‍यांची संख्या आणि वाहतूक कमी होणार आहे. इंधनाचा वापर कमी होणार असल्याने दूषित वायूंचे प्रमाण कमी होऊन चांगल्या वातावरणाची निर्मिती होण्यास मदत होईल.

नाशिक : पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना नकाशा पाहताना जिल्हाधिकारी गंगाथरण डी
बारामती फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनास वेग येणार

2 शहरांमधील प्रवास 1 तास ४५ मिनिटांमध्ये पूर्ण होणार...

प्रस्तावित रेल्वेमार्ग पुणे, नगर, नाशिक जिह्यातून जात आहे. चाकण, राजगुरुनगर (खेड), मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर येथील उद्योग, विशेष आर्थिक क्षेत्र आणि कृषी केंद्रांना प्रकल्प जोडणारा आहे. प्रकल्पातंर्गत २३५ किलोमीटर विद्युतीकरणासह ग्रीनफिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे दुहेरी मार्ग बांधण्यात येणार आहे. दोन शहरांमधील प्रवास एक तास ४५ मिनिटांमध्ये पूर्ण होईल. या प्रकल्पात नाशिक तालुक्यातील ५ गावे आणि सिन्नर तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे.

नाशिक : पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना नकाशा पाहताना जिल्हाधिकारी गंगाथरण डी
जमीन व्यवस्थापनासाठी जीएसआय प्रणाली महत्त्वाची

निम्म्याने मिळणार कमी दर
जिल्हास्तरीय समितीने निश्‍चित केलेल्या दरानुसार भूसंपादन न झाल्यास भूसंपादन कायद्यानुसार देण्यात येणारा दर निम्म्याने कमी असेल. थेट खरेदीने जमीन दिल्याने ग्रामीण भागात ५ पट आणि नगरपालिका हद्दीत अडीच पट अधिकचा दर मिळणार आहे. बांधकाम, घर, विहीर, पाईपलाइन, फळझाडे, वनझाडे, शेततळे यांचे निश्‍चित मूल्यांकन रकमेवर अडीच पट अधिक मिळणार आहेत. भूधारकांना त्यांच्या बँक खात्यावर २४ तासात मोबदला दिला जाणार आहे. जिल्हास्तरीय समितीने बाजारमूल्य दराच्या दीडपट ते दुप्पट दरांना मान्यता दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com