Nashik Crime News: अफीम, गांजासह मद्याचा मोठा साठा जप्त; सिन्नर शहरात अवैध व्यवसायांची भरभराट

seized stuff
seized stuffesakal

Nashik Crime News : जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने मंगळवारी सिन्नर शहरातील कानडी मळा परिसरात नागरी वस्तीत चालवल्या जाणाऱ्या अवैध मद्यविक्रीच्या ठेवल्यावर धाड टाकत स्थानिक पोलिसांना मोठा दणका दिला आहे.

या कारवाईत अफीम, गांजा या प्रतिबंधित पदार्थांबरोबरच देशी-विदेशी मद्याचा साठा देखील हस्तगत करण्यात आला. एक महिला व पुरुष यांना याप्रकरणी अटक करून स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. (Large cache of liquor seized along with opium ganja Illegal businesses increased in Sinnar city Nashik Crime News)

जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध व्यवसाय उध्वस्त करण्याच्या मोहिमेला स्थानिक पातळीवर अपयश येत असल्याने पोलीस अधीक्षक श्री. उमाप यांनी विशेष पथकांची स्थापना केली आहे. या पथकांमार्फत संपूर्ण जिल्हाभरात यशस्वी कारवाई करण्यात येत आहेत.

स्थानिक पातळीवर वर्षानुवर्षे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेले अवैध व्यवसाय अद्यापही बिनबोभाट सुरू असल्याचे या कारवायांनी अधोरेखित झाले आहे. सिन्नर शहरातील कानडी मळा येथे असलेल्या धनश्री रो हाऊस मध्ये अवैध मद्य तसेच प्रतिबंधात्मक अमली पदार्थांचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाने सिन्नर मधील कारवाई यशस्वी केली. या कारवाईत सुमारे 34 हजार रुपये किमतीचे देशी-विदेशी मद्य, 35 हजार रुपये किमतीचे अफीम व गांजा तसेच महाराष्ट्रात विक्री प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला आढळून आला.

धनश्री रो हाऊस येथे घरात हा मुद्देमाल लपवून ठेवण्यात आला होता. गोमाराम तेजाराम चौधरी (29) मुळ रा. राजस्थान व नंदा धनंजय काळे ( 33) , रा. कानडी मळा सिन्नर या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली . सुमारे 84 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

seized stuff
Crime News : 'पतीसोबत नको तर माझ्यासोबत दर्शनासाठी चल' म्हणत महिलेचा विनयभंग, पतीला मारहाण

पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील विशेष पथकातील पोलीस शिपाई आरती दामले, योगिता काकड भरत शिंदे, निलेश अहिरे यांनी ही कारवाई केली. कारवाई यशस्वी झाल्यानंतर सिन्नर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली.

त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, हवालदार नवनाथ पवार, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, शहाजी शिंदे, आप्पासाहेब काकडे, काशीराम सदगीर आदींनी घटनास्थळी धाव घेत जप्त केलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करून दोघा संशयीतांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक सतीश डोले याप्रकरणी तपास करीत आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. उमाप यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध व्यवसायांचा बिमोड करण्याची मोहीम राबवली जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवर पोलीस ठाणे क्षेत्रात या आदेशाला दुर्लक्षित करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

त्यामुळेच पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत . या पथकांकडून कारवाई होत असताना स्थानिक पोलीस यंत्रणा मात्र अपयशी ठरत आहे. ग्रामीण भागात गुन्हेगारी, अवैध व्यवसाय थांबवण्यात स्थानिक पोलीस यंत्रणा कमी पडते की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

seized stuff
Jalgaon Crime News : 2 गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com