Nashik News : बिबट्यालाही आवरला नाही द्राक्ष खाण्याचा मोह! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

grapes eaten by leopard nashik news

Nashik News : बिबट्यालाही आवरला नाही द्राक्ष खाण्याचा मोह!

वणी (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे मागील वर्षभरापासुन दोन बिबटे (Leopard) व दोन पिल्ले गावाच्या उत्तर बाजुस असलेल्या डोंगर परिसरात राहत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. (leopard had eaten two to three bunches of grapes in vani nashik news)

नाशिक च्या आंबट गोड द्राक्षांनी परदेशात देखील अनेकांच्या जिभेवर गोडी निर्माण केली आहे, आता मानव वस्तीत राहणारा बिबट्या देखील द्राक्ष खात असल्याचे आढळुन आले आहे. बिबट्याने चक्क दोन ते तीन द्राक्ष घड खाल्ल्याचे दिसुन आले.

शिंदवड, ता. दिंडोरी येथील भाऊसाहेब पुंडलिक मोरे यांच्या शिंदवड शिवारातील शेतात काळी द्राक्ष काढणीसाठी तयार झाली आहेत. नेहमी प्रमाणे त्यांचे बंधु अशोक पुंडलिक मोरे बागेतुन जवळच असलेल्या परशराम बाबा यांच्या समाधीच्या पुजेसाठी जात असतात, यावेळी बागेतुन ओरडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडताच त्यांनी खाली बसुन बघितले तर बागेच्या दुसऱ्या टोकाला बिबट्या आपल्या पंजाने बागेच्या वेलीवर ओरखडत होता व द्राक्ष खाली पाडत होता.

यावेळी मोरे यांनी जवळच असलेल्या घरामधील व्यक्तींना आवाज देताच बिबट्याने आवाज ऐकताच धुम ठोकली.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

आता दिवसाढवळ्या देखील बिबट्याचे दर्शन होवु लागले आहे. बिबट्याने पाच सहा दिवसापुर्वी रत्नगड जवळ राहत असलेले कचरु पवार व सुनिल गांगुर्डे यांच्या घराजवळुन कुत्र्याला ओढत नेवुन ठार केले शनिवारी मिराबाई गांगुर्डे यांनी सकाळी ८:३० वा बिबट्या घरासमोरच्या शेतातुन जात असतांना बघितला.

तसेच आठ दिवसापुर्वी मेंढपाळ ताराचंद ढेपले हे रात्री कांद्याच्या शेतात मुक्कामी होते परिसरात असणाऱ्या बिबट्याने रात्री १:३० वाजेच्या सुमारास शेळ्या मेंढ्याच्या कळपात घुसुन हल्ला केला मेढ्यांच्या आवाजाने ढेपले हे जागे झाले व कोकरु ठार करुन बिबट्याने बोकड पकडल्याचे दिसुन आले.

बोकड वाचवण्यासाठी ढेपले यांनी आरडाओरडा केला त्या नंतर बिबट्या पळुन गेला. पण बिबट्याच्या दहशतीने रात्री शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी शेतकरी जीव मुढीत घेवुन आपल्या पिकाला पाणी देतात, आता तर दिवसाढवळ्या बिबट्या दर्शन देत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले असुन बिबटे पकडण्यासाठी पिंजरे वाढवण्याची मागणी शिंदवड ग्रामस्थांकडुन करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikGrapesLeopard