Nashik News : पळसे येथे बिबट्या जेरबंद!

Leopard imprisoned in Gaikhe Mala area.
Leopard imprisoned in Gaikhe Mala area.esakal

नाशिक रोड : पळसे गायखे मळा या परिसरात चार ते पाच दिवसापासून तीन बिबट्यांचे सतत दर्शन नागरिकांना होत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ भीतीच्या दहशतीखाली वावरत होते. अशातच सोमवारी (ता. १६) पहाटे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाने संबंधित बिबट्याला गंगापूर येथील नर्सरीत ठेवले आहे. (Leopard jailed in Palase Nashik News)

पळसे येथील बंगाली बाबा, गायखे मळा परिसरात तीन बिबट्यांचा वावर नागरिकांना आढळून येत होता. रोज सकाळी आणि सायंकाळी तीन बिबटे नागरिकांना मुक्तसंचार करताना दिसून येत होते. त्यामुळे पळसे येथील मळे, गाव वस्ती परिसरातील नागरिक, शेतकरी भयभीत होते. १२ जानेवारीला शिवाजी गायखे यांचे वासरू बिबट्याने गंभीर जखमी केले होते.

नागरिकांच्या प्रसंगावधानाने वासराचे प्राण वाचले, परंतु नागरिक भयभीत होते. मळे परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या नजरेस आणून देत पोलिसपाटील सुनील गायधनी यांनी विनंती केल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा लावण्यात आला.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Leopard imprisoned in Gaikhe Mala area.
Nagpur Crime News: ट्रॅव्हल्समधून गांजाची तस्करी

सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास एक ते दीड वर्षाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले. वनविभागाचे वनरक्षक गोविंद पंढरे, जयनाथ घोंगटे, अशोक कानझोडे यांनी बिबट्याला रेस्क्यू केले असून, गंगापूर रोड रोपवाटिकेत बिबट्याला निगराणीत ठेवले आहे.

आतापर्यंत एक बिबट्या जेरबंद केला असला तरीही अद्याप दोन बिबटे या परिसरात असल्याने त्यांनाही लवकरात लवकर वनविभागाने जेरबंद करावे, अशी मागणी पोलिसपाटील सुनील गायधनी व ग्रामस्थांनी केली आहे.

Leopard imprisoned in Gaikhe Mala area.
Nashik Crime News : स्पा, मसाजमधील अनैतिक धंद्यांवर छापामारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com