मांजात अडकलेल्या घुबडाला दिले जीवदान! तासाभराचे शर्थीचे प्रयत्न

owl life.jpg
owl life.jpg

सिडको (जि.नाशिक) : झाडावरील मांजात पाय अडकल्याने जखमी झालेले घुबड रात्रभर काकुळतीने स्वतःचे प्राण वाचण्याचा प्रयत्न करत असताना परिसरातील काही पक्षीप्रेमींनी पहाटे साडेपाचच्या सुमारास शर्तीचे प्रयत्न करत त्याला झाडावरून सुखरूप काढून जीवदान दिले. 

मांजात अडकलेल्या घुबडाची पक्षीप्रेमींकडून सुटका 
बॉइज टाउन शाळेच्या प्रांगणात झाडावर अडकलेल्या घुबडाचे पाय मांजात अडकले होते. त्याने स्वतःला त्यातून सोडवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. परंतु काही करता मांजातून सुटका झाली नाही. पहाटेच्या सुमारास कावळ्यांनी त्याला टोचा मारून घायाळ करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार परिसरातील पक्षीप्रेमींच्या लक्षात येताच त्यांनी पंधरा फूट उंचीवरील अडकलेल्या घुबडाला तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुखरूपपणे खाली आणले.

वन विभागाच्या ताब्यात सुपूर्द

याकरिता बॉइज टाउन शाळेचे आदेश वानखेडे, सुहास क्षीरसागर, भारत मोरे, राजू गायकवाड, संतू किडरक, दिनकर सोनवणे आदींनी प्रयत्न केले. यानंतर घुबडास वन विभागाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. घुबडावर उपचार झाल्यानंतर गंगापूर रोडवरील नर्सरीमध्ये सोडून देण्यात येईल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आपल्या समाजात घुबडाला अशुभ मानले जाते. परंतु जेव्हा कोणाचाही जीव संकटात असेल, तर त्याला वाचविणे हा मानव धर्म समजला जातो. हाच धर्म आम्ही पाळला. याचे आम्हाला मनोमनी समाधान आहे. - आदेश वानखेडे, पक्षीप्रेमी 

जखमी घुबडावर योग्य उपचार करून त्यास पुन्हा गंगापूर रोडवरील नर्सरीमध्ये सोडण्यात येईल. पक्षीप्रेमींनी केलेले कामे खरोखर प्रेरणादायी आहे. अशी कुठल्या प्रकारचे पक्षी जखमी आढळल्यास कृपया वन विभागाशी संपर्क साधावा. - अनिल अहिरराव, वन विभाग  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com