Nashik Crime News : पंचशीलनगर मधून मद्यसाठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A team of Bhadrakali police with the detained suspect.

Nashik Crime News : पंचशीलनगर मधून मद्यसाठा जप्त

जुने नाशिक : पंचशील नगर भागातून सुमारे आठ हजारांचा देशी-विदेशी मद्यसाठा भद्रकाली पोलिसांनी जप्त केला. सोमवारी (ता.३०) रात्री सव्वा आठच्या सुमारास कारवाई करण्यात आली. साठ्यासह एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. (Liquor stock seized from Panchsheelnagar Nashik Crime News)

गंजमाळ पंचशीलनगर भागात एक जण बेकायदेशीर रित्या देशी विदेशी मद्य विक्री करत होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांना माहिती मिळाली. त्यांनी गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर खांडवी यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी अहिरे, कर्मचारी कय्युम सय्यद, विशाल काठे, संजय पोटिंदे, नितीन भामरे, श्यामकांत पाटील घटनास्थळी दाखल झाले. पथकाची चाहूल लागताच संशयिताने पळ काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

पथकाने जागीच त्यास ताब्यात घेतले. सलमान मोहम्मद शेख (वय.२८,रा. पंचशील नगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून देशी विदेशी सुमारे आठ हजारांचा मद्यसाठा आणि एक हजाराची रोख रक्कम असा सुमारे ९ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

संशयित अज्जू पूर्ण नाव समजू शकले नाही. याचा माल असल्याचे संशयिताने सांगितले. अज्जू घटनास्थळावरून पळ काढण्यास यशस्वी झाला. भद्रकाली पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.