नांदगाव तालुक्यातील पशुधन धोक्यात; शेतकरी चिंतेत

livestock
livestockesakal

नांदगाव (जि. नाशिक) : जिल्ह्यातील सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या तालुक्यात ओल्या दुष्काळासोबत आता पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर वळणावर आला आहे. अचानक ताप येण्यासोबतच टाकलेली वैरण खाण्याऐवजी पायांच्या खुरामध्ये जखमा वाढत जाऊन अचानक जनावरे दगावण्याच्या घटनांमुळे पशुधन पालक चिंतेत आहे.

जनावरांना विविध रोगांची बाधा

नांदगाव तालुक्यातील पशुधनावर उवा, गोचिड, लिखा यासोबत पोटदुखी, अपचनाचे प्रमाण वाढत असताना आता लाळ्या, खरकुत, लंपी आदी विविध आजारांनी पशुधन अडचणीत आले असून, पशुपालकांसमोर मोठा प्रश्‍न आहे. येथील पशु वैद्यकीय केंद्रात मुळातच रिक्त पदांच्या संख्येमुळे रोगराईला बळी पडलेल्या पशुधनावर खासगी व महागडे वैद्यकीय उपचार करून घ्यावे लागत आहे. जनावरांच्या लाळ्या, खरकुतीच्या वाढत्या आजारांवर लसीकरण हा पर्याय असल्याने लसीकरण मोहिमेला चालना देण्याची मागणी पशुपालकांनी केली असली तरी जनावरांना होणाऱ्या लंपी आजारावर अद्याप लस नसल्याने जनवारे दगावत आहे. दोन महिन्यांपासून विविध आजार जनावरांना होऊ लागले आहे. गावागावातून पाळीव जनावरे लंपीरोगाने ग्रस्त झाले आहे.

livestock
भाव नसल्याने शेतकऱ्यांनी झेंडू फेकला, व्यापाऱ्यांनी तोच गोळा करून २०० रूपयांना विकला

जनावरे मृत्यूची नोंदच नाही...

नांदगाव, हिसवळ, कोंढार, नांदूर, हिंगणवाडी, फुलेनगर, श्रीरामनगर, क्रांती नगर, न्यायडोंगरी, बोलठाण, वेहेळगाव, पळासी, सावरगाव, अमोदे, जळगाव, कळमदरी, गिरणा डॅम, भालूर, लोहशिंगवे, लक्ष्मीवाडी, सोयगाव, पोखरी, जातेगाव, पिंपरखेड, गोंडेगाव, परधाडी आदी ठिकाणी लंपी व लाळ्या, खुरकत रोगाने शेकडो जनावरे दगावली आहेत. पण, त्याची नोंदच झालेली नाही.

livestock
लस राहू द्या, आता गोळी आली! कोरोना टॅब्लेटला इंग्लंडमध्ये मान्यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com