LLB CET Exam : एलएलबी-३ वर्षे सीईटी परीक्षेला सुरवात! संगणकाधारित परीक्षा | LLB 3 Years CET Exam Begins Computer Based Examination nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Computer Based Examination

LLB CET Exam : एलएलबी-३ वर्षे सीईटी परीक्षेला सुरवात! संगणकाधारित परीक्षा

LLB CET Exam : पदवीनंतर तीन वर्षे कालावधीच्‍या विधी शाखेतील एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या सीईटी परीक्षेला मंगळवार (ता.२) पासून सुरवात झाली. ऑनलाइन पद्धतीने आयोजित या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सत्रनिहाय परीक्षा केंद्रावर हजेरी लावली.

इंग्रजीसह अन्‍य काही प्रश्‍नांची काठीण्यपातळी अधिक राहिल्‍याचे परीक्षार्थींनी सांगितले. नियोजित वेळापत्रकानुसार बुधवारी (ता.३) उर्वरित विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातील. (LLB 3 Years CET Exam Begins Computer Based Examination nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सीईटी सेलतर्फे एलएलबी-३ वर्षे सीईटी परीक्षेचे आयोजन केले आहे. संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) या परीक्षेचे वेगवेगळ्या सत्रात आयोजन केले आहे. परीक्षेची दिनांक आणि वेळ, परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता असा सविस्‍तर तपशील विद्यार्थ्यांच्‍या प्रवेशपत्रावर उपलब्‍ध करून दिलेला होता.

त्‍यानुसार विद्यार्थ्यांनी केंद्रावर उपस्‍थित राहातांना परीक्षा दिली. दोन दिवसीय परीक्षेत बुधवारी (ता.३) आणखी काही विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार असून, यानंतर पर्सेंटाईल पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे.

शहरी विद्यार्थ्यांचे केंद्र थेट ग्रामीणमध्ये

शहरात वास्‍तव्‍यास असलेल्‍या काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र थेट ग्रामीण भागात असल्‍याचे आढळले. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी दमछाक करावी लागली.

टॅग्स :NashikCET ExamLLB