
Nashik News : प्रभू रामचंद्रांना 32 हात पांढराशुभ्र फेटा! आमलकी एकादशीनिमित्त विधी
नाशिक : आमलकी एकादशीचे औचित्य साधत शुक्रवारी (ता. ३) प्रभू रामचंद्रांना रंगपंचमीचे औचित्य साधत शुभ्र वस्त्र परिधान करण्यात आले. यानिमित्त पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार श्रीरामासह लक्ष्मणाला तब्बल ३२ हात लांब फेटा परिधान करण्यात आला. (Lord Ramachandra white long feta Rituals on occasion of Amlaki Ekadashi Nashik News)
देवकलाहास निवृत्तीपूर्वक देवकला अभिवृद्धीसाठी देवतांच्या मस्तकावर पट्टबंध बांधणे याला पाटोस्तव असे प्रतिष्ठामहोददी व प्रतिष्ठामौक्तिकम या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे. त्यानुसार हा सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला.
याप्रसंगी विश्वस्त धनंजय पुजारी, श्रीमहंत सुधीरदास महाराज, निनाद पुजारी दीपक कुलकर्णी, सचिन पुजारी, प्रदीप वाघमारे यांनी आज हा विधी संपन्न केला. ३२ ही संख्या अनुष्टुप छंदाचे रुप आहे. वेदातील पुरुषसुक्त रामरक्षा पवमानसुक्तांतील बहुतांशी ऋचा याच छंदात आल्या आहे.
चारही वेदातील स्तुती मंत्र अनुष्टुपछंदात आहे. या छंदातील स्तुतीने प्राणरूपी देवता प्रसन्न होतात म्हणून देवतांनादेखील या छंदातील स्तुती आवडते. त्यानुसार हा विधी संपन्न झाला. फेटा नेसवायच्या आधी रामरायाला १६ पुरुषसुक्ताद्वारे महापूजा संपन्न केली गेल्यावर विधिपूर्वक प्रथम श्वेतवस्त्र झगा पोशाख सीतादेवीना साडी-चोळी नेसून मग श्रीरामांना प्रथम फेटा बांधायला सुरवात करण्यात आली.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
हा सोहळा तब्बल दोन तास सुरू होता. ही परंपरा पुजारी घराण्यातील २७ पिढ्यांच्या वाररसाकडून गेली अनेक वर्षे अखंड पालन केली जात आहे. श्वेत वस्त्रातील रामरायाचे दर्शन मोठे पुण्याकारक सांगितलं आहे.
एरवी अकरा महिन्याला सर्व एकादशीला पितांबर नेसवलेले असते. फक्त हा फाल्गुन मास हे पांढरे वस्त्र उन्हाळ्याच्या त्रास होऊ नये म्हणून पण असते.
रंगपंचमीच्या दिवशी केशर व पळसाचा फुलांचा रंग उकळून त्याचा रंग आगामी येणाऱ्या वासंतिक नवरात्राचे या वर्षीचे उत्सवाचे मानकरी समीरबुवा पुजारी यांच्या हस्ते ‘श्रीं’ना श्रीखंडाचा नैवेद्य श्वेत वस्त्रावर रंग व गुलाल टाकल्यावर नाशिककरांची रंगपंचमी रहाड उत्सव सुरू होईल.