नाशिक : लग्न अन् फोटोचे वेगळे नाते असले तरी लग्नाआधी प्री वेडिंग करण्याचा ट्रेंड आहे. आता प्री वेडिंगच्या ट्रेंडनंतर ‘व्हॅलेंटाइन डे’ अविस्मरणीय करण्यासाठी तरुणाईने फोटोशूटला प्राधान्य दिले आहे. यासाठी शहरातील विविध छायाचित्रकारांकडे शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळी फोटोशूट करण्यासाठी विचारणा होत आहे.
नाशिकच्या तरुणाईने ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त नवा ट्रेंड आणला आहे. शहरातील गोदावरी नदीवरील विविध मंदिर, तपोवन, गंगापूर धरण, बोट क्लब, पांडव लेणी आदींसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी छायाचित्रण करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यात येतो. हे क्षण कायम स्मरणात राहण्यासाठी तरुणाईकडून विविध आकर्षक भेटवस्तू खरेदी केले जातात. गत काही वर्षापासून फोटोशूटचा ट्रेंड बघात तरूणाई पुढाकार घेत असल्याचे दिसत असून, यासाठी छायाचित्रकारांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ पॅकेज तयार केले आहेत. विविध स्थळांनुसार छायाचित्रकारांनी दर ठरविले असून, दोन हजार पाचशे रुपयांपासून दहा हजारापर्यंत हे पॅकेज उपलब्ध आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’ फोटोशूटसाठी नाशिकमधील छायाचित्रकारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. तरुणांमध्ये प्रेम व्यक्त करण्याचा आणि ते कायमस्वरूपी अविस्मरणीय करण्याचा फोटोशूट हा नवा ट्रेंड होत असल्याचे चित्र आहे. कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यात खुले पर्यटन स्थळ खुले झाल्याने बोट क्लबला सूर्योदय, सूर्यास्ताला तरुणाई फोटोशूटसाठी गर्दी करत आहे.
प्री वेडिंग शूटनंतर आता ‘व्हॅलेंटाइन डे’ अविस्मरणीय करण्यासाठी फोटोशूटचा तरुणाईने नवा ट्रेंड आणला आहे. यासाठी पंधरा तरुण जोड्यांनी यासाठी विचारणा केली आहे. छायाचित्रणासाठी शहरासह विविध पर्यटनस्थळांची निवड केली आहे. येत्या दोन दिवसात फोटोशूट पूर्ण केले जाईल.
-दिनेश वैष्णव, छायाचित्रकार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.