Latest Marathi News | Lumpy रोगामुळे गळीत हंगाम लांबण्याची शक्यता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lumpy Disease effect news

Lumpy रोगामुळे गळीत हंगाम लांबण्याची शक्यता!

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : महिनाभरात नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. गळीत हंगामावर अनपेक्षित संकट ओढावणार आहे. शेतीतील ऊस कारखान्यापर्यत किंवा रस्त्यापर्यत आणण्यासाठी बैलगाड्या वापरल्या जातात. पण राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

त्यामुळे गाडी ओढण्यासाठी बैल उपलब्ध होण्यास अडसर येत आहे. त्यामुळे ट्रक्टर जुगाडाच्या साथीने शक्य होईल तेवढी ऊस वाहतूक होणार आहे. शिवाय धुव्वाधार पावसाचा मुक्काम लांबल्याने ऊसतोडणी व वाहतूक करणे मोठे कठीण काम आहे. त्यामुळे चिखलातून वाट काढण्यासाठी बैलगाडीची गरज पडणार आहे. (Lumpy disease is likely to prolong galit season Nashik Latest Marathi News)

जिल्ह्यात बहुतांश साखर कारखान्यांत दसऱ्याच्या मुहूर्तावर हंगामाला सुरवात होते. बैलगाडी व ट्रॅक्टर जुगाडच्या माध्यमातून तोडणी झालेला ऊस कारखान्यापर्यत आणला जातो. परंतु सध्या लम्पीमुळे प्रशासनाने जनावरांच्या वाहतुकीला बंदी घातली आहे.

त्यामुळे बैलगाडीतून होणाऱ्या ऊस वाहतुकीवर परिणाम होणार असून त्याचा फटका बैलगाडी मालकांबरोबरच साखर कारखाने, शेतकरी यांना बसणार आहे. लम्पीचा विळखा घट्ट होत असल्याने ऑक्टोबरमध्ये नाशिक जिल्ह्यात कादवा, रानवड व व्दारकाधीश या कारखान्यांचे अग्नीप्रदिपन वेळेत होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.

जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. तेथे तोडणी करताना अडचणी येणार आहेत. बैलगाड्या उपलब्ध न झाल्यास तोडणीचा हंगाम लांबणार आहे.

हेही वाचा: PFIच्या दोघांना ATSकडून अटक; 20 जणांना घेतले ताब्यात

लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात जनावरांच्या वाहतुकीला बंदी आहे. त्यामुळे मालेगाव, धुळे, नंदुरबार येथून येणाऱ्या ऊसतोड गोधनांना आणू शकणार नाही. त्यामुळे ऊस तोडणीचे नियोजन कोलमडणार आहे. वेळेत ऊस तोडून कारखान्यात न गेल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्‍न कारखान्यांसमोर उभा राहणार आहे.

"लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे परजिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी येणाऱ्या मजूर तांड्यामध्ये बैल आणू शकणार नाही. त्यामुळे ट्रॅक्टर जुगाडावर ऊस वाहतूक करावी लागेल. अधिकच्या पावसामुळे चिखल झालेल्या क्षेत्रातून तोडणी झालेला ऊस बाहेर आणण्यासाठी बैलगाडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामाला लम्पीच्या प्रार्दुभावाची झळ बसणार आहे. "
-रामभाऊ माळोदे (अध्यक्ष, रानवड साखर कारखाना)

हेही वाचा: Wildlife Organ Sale Case : झटपट श्रीमंतीसाठी तरुणाकडून कातडी विक्रीचा डाव

Web Title: Lumpy Disease Is Likely To Prolong Galit Season Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikDiseaseCattle