
Nashik Crime News : शहरात होतेय लक्झरी कार्सची चोरी
Nashik Crime News : नाशिक शहरात आता लक्झरीयस वाहन चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले असून, शहर परिसरातील भर वस्तीचा भाग समजल्या जाणाऱ्या खडकाळी परिसरातून फॉर्चुनर ही महागडी कार चोरट्यांनी बनावट चावीच्या साहाय्याने आणि गाडीचे सेन्सर हॅक करून चोरून नेल्याची घटना घडली आहे. (Luxury cars are being stolen in city nashik crime news )
तर काही दिवसांपूर्वी पखाल रोड परिसरातून देखील अर्टिगा कंपनीची घरासमोर उभी असलेली अर्टीगा कार देखील चोरट्यांनी चोरून नेली आहे.
ही घटना ताजी असतानाच खडकाळी परिसरात असलेल्या जन्नत हॉटेल समोर उभी केलेली हाजी अझहर फारुक शेख यांची फॉर्चूनर कंपनीची सुमारे 30 लाख रुपये किंमतीची लक्झरीयस कार ही चोरट्यांनी स्विफ्ट कार मध्ये येऊन फॉर्चूनर कंपनीच्या सिस्टम हॅक करून आणि दुप्लिकेट चावीच्या साहाय्याने ही कार चोरून नेल्याचे सांगण्यात आले आहे.
पुढे ही कार नाशिकच्या ओढापर्यंत गेली आणि त्यानंतर ही कार पुढे कुठे गेली याबाबत अधिक माहिती मिळाली नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यातच चोरट्यांनी वापरलेली स्विफ्ट कार ही मालेगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेला अनेक दिवस उलटून गेले आहे. पोलिसांना चोरीबाबतचे CCTV फुटेज दिले तरीदेखील पोलीस योग्य तो तपास करत नसल्याचा आरोप गाडी मालक शेख यांनी केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेऊन तात्काळ आरोपी अटक करत चोरीला गेलेली कार हस्तगत करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.