Womens Day : गोदावरीची उद्या होणार महाआरती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Godavari River

Womens Day : गोदावरीची उद्या होणार महाआरती!

नाशिक रोड : नाशिक रोडच्या शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्था आणि निर्मल गोदागौरव फाउंडेशनतर्फे गोदाघाटावर ८ मार्चला सायंकाळी सहाला गोदावरीची (Godavari) महाआरती करण्यात येणार आहे. (Maha Aarti of Godavari will be performed at Godaghat on March 8 evening nashik news)

शिखर स्वामिनीच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि निर्मल फाउंडेशनच्या अध्यक्षा सुरेखा बोऱ्हाडे यांनी ही माहिती दिली. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ला मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

महिला दिनानिमित्ताने होणाऱ्या या महाआरतीत नाशिकमधील ऑल इंडिया लीनेस क्लब नाशिक रोड, रणरागिनी मराठा महिला मंडळ, देशमुख समाज महिला मंडळ, साहित्य परिषद संस्था, नाशिक रोड, गणेश आराधना मंडळ, श्रीनिका फाउंडेशन, वंजारी बहुउद्देशीय संस्था, तनिष्का गट शिवाजीराव देशमुख सामाजिक व शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत. गोदावरी गौरव महिमा आणि जल स्वच्छता यावर सुरेखा बोऱ्हाडे यांचे व्याख्यान होईल.