Maharashtra Chamber of Commerce : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी

Lalit Gandhi and Anilkumar lodha
Lalit Gandhi and Anilkumar lodhaesakal

Maharashtra Chamber of Commerce : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर संस्थेच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची फेरनिवड तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली आहे. (Maharashtra Chamber of Commerce Lalit Gandhi President nashik news)

चेंबरच्या अध्यक्षपदासाठी ललित गांधी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी अनिलकुमार लोढा, करुणाकर शेट्टी आणि उमेश दाशरथी असे तिघांचे अर्ज दाखल झाले होते.

पैकी करुणाकर शेट्टी आणि उमेश दाशरथी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली. चेंबरचे सरकार्यवाह सागर नागरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ललित गांधी म्हणाले की, ललित गांधी गेल्या २१ वर्षापासून महाराष्ट्र चेंबरमध्ये कार्यरत असून गव्हर्निंग काऊन्सील सदस्य, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिखर संस्थांवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Lalit Gandhi and Anilkumar lodha
Nashik Smart City : स्मार्ट सिटीचे सौंदर्य डेब्रिजमुळे मातीमोल; विद्रुपीकरणात बांधकाम व्यावसायिकांकडून भर

शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या राज्याच्या शिखर संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी पुन्हा मिळणे ही दुर्मिळ व महत्त्वपूर्ण घटना आहे. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासह चेंबरच्या कार्यक्षेत्रातील सर्व भागांतील व्यापार-उद्योग-कृषी व कृषिपूरक उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार आहे.

नूतन वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांनी महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे दोनदा उपाध्यक्षपद भूषविले आहे. ते गेल्या २० वर्षापासून चेंबरशी संलग्न आहेत. गेले ४ टर्म त्यांनी कार्यकारिणी मंडळात प्रतिनिधित्व केले होते.

१६ जूनला राजभवनात सोहळा

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे ५० वे सत्र राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. १६ जूनला सायंकाळी ४ वाजता राजभवनातील दरबार हॉल मध्ये दिमाखदार सोहळ्याचे नियोजन केले असून निर्वाचित अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्षांचा पदग्रहण समारंभ या वेळी संपन्न होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Lalit Gandhi and Anilkumar lodha
Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार; शिक्षण प्रशासनाधिकारीपदी डॉ. मिता चौधरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com