esakal | Maharashtra Day 2021 : नाशिकमध्ये कोरोना नियमांचे पालन करून छगन भुजबळांच्या हस्ते ध्वजारोहण

बोलून बातमी शोधा

maharashtra din
नाशिकमध्ये कोरोना नियमांचे पालन करून छगन भुजबळांच्या हस्ते ध्वजारोहण
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते

नाशिक : कोरोना नियमांचे पालन करून महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापनदिनानिमित्त नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक, रोड येथे आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 13 एप्रिल 2021 च्या आदेशान्वये करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित वावर ठेवत कमीत कमी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे ध्वजारोहण करण्यात आले.

हेही वाचा: प्रबळ इच्छाशक्तीने कोरोनावर मात! मनमाडच्या ९२ वर्षीय आजोबांचा लढा

शासकीय ध्वजारोहण संपन्न

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस प्रशिक्षण प्रबोधनीच्या संचालक अश्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित होते.

हेही वाचा: डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"

सोशल डिस्टन्सिंगचे पालन

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून, कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) च्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. पालकमंत्री भुजबळ यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.