लसीकरणाचे शंभर दिवस: लसींचा तुटवडा असतानाही महाराष्ट्र देशात ‘नंबर वन'

राज्यात सर्वाधिक बरे झालेल्यांसह नवीन अन्‌ उपचाराधीन रुग्णांप्रमाणे मृत्यू अधिक
vaccine
vaccineesakal

नाशिक : कोरोनाविरुद्धच्या लढाईत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत लसीचा राज्यात तुटवडा कायम आहे. आज लसीकरणाला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर लसीकरणाची काय स्थिती आहे हे पाहिले असता, देशात एक कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ जणांच्या लसीकरणात देशामध्ये महाराष्ट्र ‘नंबर वन’स्थानी राहिला. त्याखालोखाल राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरातचा क्रमांक लागतो. शिवाय देशात सर्वाधिक ६१ हजार ४५० रुग्ण बरे होण्याने राज्याला दिलासा मिळाला असला, तरीही दैनंदिन नवीन रुग्ण, उपचाराधीन रुग्ण आणि मृत्यूंमध्ये देशात राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले.

राज्यात सर्वाधिक बरे झालेल्यांसह नवीन अन्‌ उपचाराधीन रुग्णांप्रमाणे मृत्यू अधिक

राज्यात ६६ हजार १९१ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याचवेळी सात लाखांहून अधिक रुग्ण ‘ॲक्टिव्ह’ अर्थात उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासांत ८३२ मृत्यू राज्यात झाले आहेत. दिल्लीमध्ये ३५०, उत्तर प्रदेशात २०६, छत्तीसगडमध्ये १९९, गुजरातमध्ये १५७, कर्नाटकमध्ये १४३, झारखंडमध्ये १०३, मध्य प्रदेशात ९२, तमिळनाडूमध्ये ८२, पंजाबमध्ये ७६ मृत्यू झालेत. या दहा राज्यांतील दैनंदिन मृत्यूचे प्रमाण देशाच्या तुलनेत ८० टक्के आहे. दरम्यान, देशात १४ कोटी १९ लाखांच्या पुढे लसीकरण झाले आहे. त्यात महाराष्ट्रानंतर राजस्थानमधील एक कोटी २४ लाख, उत्तर प्रदेशातील एक कोटी १८ लाख, गुजरातमधील एक कोटी १६ लाख, पश्‍चिम बंगालमध्ये एक कोटी, कर्नाटकमध्ये ८७ लाख, मध्य प्रदेशात ७९ लाख, केरळमध्ये ६९ लाख लसीकरण झाले आहे.

vaccine
लेकाच्या डोक्यावर अक्षता टाकून कृषिमंत्री लगेच ऑन फिल्ड!

मुंबईत २३ लाख लसीकरण

राज्याचा विचार करता मुंबईत २२ लाख ७५ हजार ८६३ जणांचे लसीकरण करण्यात आले. पुण्यात २० लाख ६८ हजारांचा, ठाण्यात ११ लाखांचा, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये प्रत्येकी नऊ लाखांपर्यंत लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये १९, नंदुरबारमध्ये ९.६०, जळगावमध्ये १२.६०, धुळ्यात १६, नगरमध्ये १७ टक्के लसीकरण झाले आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार करता जवळपास ७० लाख लोकसंख्येपैकी आतापर्यंत सहा लाख ४० हजार लसीकरण झाले आहे. मध्यंतरी नाशिक जिल्ह्यातून सतत पाठपुरावा करण्यात आला असताना एक लाख लस मात्रा प्राप्त झाली होती. त्यानंतर मात्र नाशिकला लस उपलब्धतेसाठी फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. लस उपलब्ध नसल्याने अनेक केंद्र बंद ठेवण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर आली होती. जिल्ह्याला आज सकाळी लस उपलब्ध झाली. ती तालुकास्तरापर्यंत पोचण्यासाठी दुपार झाली आणि मग तेथून पुढे लसीकरण सुरू झाले. आठवड्याच्या पहिल्या दिवशी लस घेण्यासाठी घराबाहेर पडलो, पण लस मिळाली नाही, अशी नाशिककराची उपरोधिक पोस्ट सोशल मीडियातून धुमकाळ घालत होती. मुळातच, यापूर्वी गोवर लसीकरणाची मोहीम राज्यातील आरोग्य यंत्रणेने दीड महिन्यात पूर्ण केली होती. आताही लसीची मात्रा मोठ्या प्रमाणात मिळाल्यास राज्यातील लसीकरणाचे काम दोन ते अडीच महिन्यात पूर्ण होऊ शकेल, असा विश्‍वास वरिष्ठ आरोग्याधिकाऱ्यांना वाटतो आहे.

vaccine
ऑक्सिजन कॉन्‍सट्रेटरची किंमत भिडली गगनाला; पुरवठा व्‍यवस्‍था प्रभावित

देशात २४ तासांत दोन लाखांहून अधिक रुग्ण बरे

देशात आतापर्यंत एक कोटी ४३ लाख चार हजार ३८२ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीयदर ८२.६२ टक्के आहे. गेल्या २४ तासांत दोन लाख १९ हजार २७२ रुग्ण देशात बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांपैकी ७८.९८ टक्के रुग्ण दहा राज्यांमधील आहेत. त्यात उत्तर प्रदेशातील २५ हजार ६३३, दिल्लीतील ११ हजार ५९५, मध्य प्रदेशातील ११ हजार ३२४, तमिळनाडूतील ११ हजार ६५, पश्‍चिम बंगालमधील आठ हजार १२२, बिहारमधील सात हजार ५३३, कर्नाटकमधील सहा हजार ९८२ कोरोनामुक्त आहेत. त्याचबरोबर गेल्या २४ तासांत साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, गुजरात, राजस्थान या दहा राज्यांतील देशातील एकूण नवीन कोरोनाग्रस्तांपैकी ७४.५ टक्के रुग्ण आहेत. महाराष्ट्राच्या खालोखाल उत्तर प्रदेशात ३५ हजार ३११, कर्नाटकमध्ये ३४ हजार ८०४ नवीन रुग्ण आढळून आलेत. देशात सद्यःस्थितीत २८ लाख १३ हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त उपचाराधीन आहेत. देशातील एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण १६.२५ टक्के इतके आहे. उपचाराधीन असलेल्या रुग्णांपैकी ६९.६७ टक्के रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तमिळनाडू, गुजरात आणि केरळ या आठ राज्यांमधील आहेत. आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, देशातील मृत्युदरात घट होत असून, सध्या हा दर १.१३ टक्के आहे. गेल्या २४ तासांत देशात दोन हजार ८१२ रुग्ण दगावलेत. दहा राज्यांत रुग्ण दगावण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. दिल्लीत ३५० जणांचा मृत्यू झाला.

जिल्हानिहाय आतापर्यंत झालेले लसीकरण

नगर ः चार लाख सात हजार ३६८ नांदेड ः तीन लाख ७३३

अकोला ः एक लाख ७० हजार ४६४ नंदुरबार ः एक लाख दहा हजार ९३२

अमरावती ः दोन लाख ६३ हजार ९२६ नाशिक ः सहा लाख ३९ हजार ४०९

औरंगाबाद ः तीन लाख ९३ हजार १०९ उस्मानाबाद ः एक लाख ३४ हजार ३१५

बीड ः एक लाख ९८ हजार ५६७ पालघर ः दोन लाख ५४४

भंडारा ः एक लाख ९८ हजार ६९४ परभणी ः एक लाख ४१ हजार ६२१

बुलढाणा ः दोन लाख ४८ हजार ६४९ रायगड ः दोन लाख १६ हजार २७३

चंद्रपूर ः दोन लाख १३ हजार ९७६ रत्नागिरी ः एक लाख ४५ हजार ११६

धुळे ः एक लाख ७५ हजार ८९१ सांगली ः पाच लाख १५ हजार २२५

गडचिरोली ः ७८ हजार ७२२ सातारा ः पाच लाख ४४ हजार १८०

गोंदिया ः एक लाख ५३ हजार ९४४ सिंधुदुर्ग ः ९९ हजार ३३८

हिंगोली ः ६२ हजार ३९० सोलापूर ः तीन लाख एक हजार ७६८

जळगाव ः दोन लाख ७७ हजार ४३ वर्धा ः दोन लाख एक हजार ४७३

जालना ः एक लाख ६८ हजार २९१ वाशीम ः एक लाख ४३ हजार ६०७

लातूर ः दोन लाख १९ हजार ८२० यवतमाळ ः दोन लाख १९ हजार ८७२

(ही आकडेवारी पहिल्या आणि दुसऱ्या डोसची आहे).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com