
Rangpanchami Festival : मालेगावला रंगपंचमीनिमित्त रंगांची उधळण; शेकडो किलो रंगांची विक्री
मालेगाव (जि. नाशिक) : शहरात रविवारी (ता.१२) साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमीच्या पाश्र्वभूमीवर येथील मुख्य चौकांमध्ये रंग विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. रंगपंचमीचा उत्साह बाळगोपाळांसह नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
चिमुरड्यांसह तरुणाई रंग खरेदी करीत आहेत. आतापर्यंत शेकडो किलो रंगांची विक्री झाली आहे. (Malegon bursting with colors on occasion of Rangpanchami Selling hundreds of kilos of colors nashik news)
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
शहर व परिसरात रंगपंचमीचा उत्साह नागरिकांमध्ये दिसून येत आहे. घाऊक बाजारात दीड महिन्यापुर्वीच रंगांची खरेदी-विक्री सुरु झाली होती. व्यापाऱ्यांनी सुरवातीला ५० रुपये किलोप्रमाणे रंग विक्री केला.
सध्या रंगाच्या मालाचा काहीशा प्रमाणात तुटवडा भासल्याने येथे रंगाच्या किलोमागे दहा रुपये वाढले आहेत. येथे लाल, नारंगी, पिवळा, गुलाबी या रंगांना विशेष मागणी आहे. नागरिकांकडून नैसर्गिकरित्या तयार केलेल्या रंगांना नागरिक पसंती देत आहेत. या रंगांमध्ये सुगंधित रंगही विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत.
शहरात चौकाचौकात रंग विक्रीची दुकाने लागली आहेत. लहान मुले रंग खेळण्यासाठी कार्टून पिचकारी, पंप, मोठे पंप, फुगे आदी वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी रंगांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पिचकारी साडेतीनशे रुपये डझनपासून विकली जात असल्याचे येथील घाऊक व्यापारी शुभम चव्हाण यांनी सांगितले.