पठ्ठ्याने पोलिसांनाच लावले कामाला; कापून घेतली हाताची नस

कुटुंबातील सदस्यांना घाबरविण्यासाठी एका पठ्ठ्याने कांगावा करत पंचवटी पोलिस ठाण्यासमोर स्वत:च्या हाताची नस कापून घेतली.
Police
Policeesakal

नाशिक : उधळपट्टीने त्रस्त झालेल्या कुटुंबातील सदस्यांना घाबरविण्यासाठी एका पठ्ठ्याने मंगळवारी (ता. १६) कांगावा करत पंचवटी पोलिस ठाण्यासमोर स्वत:च्या हाताची नस कापून घेतली. हे कमी की काय, म्हणून काही गोळ्या खात पोलिसांनाच कामाला लावले. घरच्या आर्थिक स्थितीचा रोष कमी करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे सकृतदर्शनी पुढे आले आहे.

...अन् भलताच प्रकार आला पुढे

सचिन मधुकर रणखांबे (वय ४६, रा. गायत्रीनगर) असे नस कापून घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सचिन रणखांबे यांनी मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक पंचवटी पोलिस ठाण्यासमोर येऊन डाव्या हाताची नस कापून घेतली. त्यानंतर गोंधळ करीत त्याने सोबत आणलेल्या काही गोळ्या खाल्ल्या. पंचवटी पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच, तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिस निरीक्षकापासून तर सगळे कर्मचारी सचिनच्या या कृतीमुळे कामाला लागले. पोलिस ठाण्यातील ताफा जिल्हा रुग्णालयात जमला. तेथे पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, भलताच प्रकार पुढे आला.

Police
बहिणीवर चाकूहल्ला करून भावाचा आत्महत्येचा प्रयत्न

नस कापून घेतल्याचा आरोप असलेल्या संशयिताने त्याच्या घरातील मोठ्या रकमेची उधळपट्टी केली. काही तोळे सोन्याची विल्हेवाट लावून तो घरी आल्यानंतर घरच्या मंडळींनी त्याला त्याचा जाब विचारला व घरी येण्यास प्रतिबंध केल्याने त्याने कांगावा करीत हे कृत्य केल्याचे त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. आधी घरच्या कुटुंबाला आर्थिक कटकटीत त्रस्त करताना, त्याने पोलिसांना त्रस्त केल्याचे ऐकल्यावर पोलिसांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली.

Police
जावयाने केली सासू व मेव्हणीची हत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com