
Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर ते जव्हार रस्त्यावर लाकडी बल्लीने मारहाण करून परप्रांतीयाची हत्या
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : त्र्यंबकेश्वर ते जव्हार रस्त्यावर घोडीपाडा येथे अज्ञात व्यक्तींनी लाकडी बल्ल्यांनी मारहाण करून एका परप्रांतीय इसमाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर घटनेची नोंद हर्सूल पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. (man killed by beating him with wood on Trimbakeshwar to Jawhar road ghodipada Nashik Crime News)
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
या घटनेची अधिक माहिती अशी की, सीताराम मोतीराम वर्मा, वय 38, रा. बलाईयो का मुहल्ला, भैसावा, तहसील फुलेऱा, जि. जयपूर, राजस्थान सध्या रा. घोडीपाडा यांनी हर्सूल पोलीस स्टेशन येथे अज्ञातविरोधी गुन्हा नोंद केला असून,
त्यानुसार घोडीपाडा ते जव्हार रस्त्याच्या कडेला फणसाच्या झाडाजवळ राधेश्याम गंगाराम वर्मा, वय 38 रा. मेई, राजनपुरा, मिराजनपुरा, जिल्हा सिक्कर, राजस्थान यास अज्ञात व्यक्तीने लाकडी बल्लीच्या साहाय्याने जीवे ठार मारल्याचा प्रकार घडला असून, अज्ञाताविरोधी हर्सूल पोलीस स्टेशन येथे 302 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास स.पो. नि. गणेश म्हस्के हे करीत आहेत.