गुटख्याचे पैसे मागितल्याने मालेगावात एकाचा तलवारीने खून

Crime
CrimeSakal

मालेगाव (जि. नाशिक) : गुटखा व इतर सामानाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने पान दुकानदार शेख अबरार शेख सलीम (वय ३३, रा. हैदरअली चौक, मालेगाव) या पान दुकानदाराचा सुरी व तलवारीने खून करण्यात आला. पोलिसांनी तिघांना अटक केली. मंगळवारी (ता. २७) सायंकाळी सव्वासात ते साडेसातच्या दरम्यान अमीन मौलाना दर्ग्याजवळील चौकातील पान दुकानाजवळ हा प्रकार घडला.

शेख अबरार याच्या पान दुकानातून जमाल अंजुम मोहंमद आयुब, बिलाल अहमद मोहंमद आयुब, मोहंमद आयुब ऊर्फ जल्ला (सर्व रा. फातमा मशिदीजवळ, रमजानपुरा) यांनी गुटखा व इतर सामान घेतले. पैसे मागितल्याचा राग आल्याने शेख अबरारला मोहंमद आयुबने खाली पाडले. जमाल अंजुम व बिलाल अहमद यांनी त्यांच्या हातातील तलवार व सुऱ्याने अबरारच्या डोक्यात, पोटावर व छातीवर वार केले, यात तो जागीच ठार झाला. रमजानपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली. (Man stabbed to death in Malegaon)

Crime
मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था; खासदार गोडसे म्हणतात…
Crime
नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : चोरीचा तपास लागला, 2 निलंबीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com