मनमाड | 21 एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manmad st

मनमाड | 21 एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मनमाड (जि.नाशिक) :  मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या एस.टी. कामगारांच्या आंदोलनात सहभागी  होण्यासाठी  जाणाऱ्या मनमाड आगारातील २१ एसटी कर्मचाऱ्यांना मनमाड पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. मनमाडहुन पंचवटी एक्स्प्रेसने हे आंदोलक मुंबईकडे निघाले होते. सकाळीच मनमाड रेल्वे स्थानकातच पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांकडून रेल्वे गेटजवळ अडविण्यात आले

एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करा. यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी चक्काजाम करत आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे शासनाकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटी वाहतुक ठप्प झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. दरम्यान, आज राज्यभरातील एसटी कर्मचारी मंत्रालयावर धडक मोर्चा नेत असून या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनमाड बस आगारातील २१ एसटी कर्मचारी देखील सहभागी होण्यासाठी सकाळी मनमाडहुन मुंबईकडे निघाले होते सकाळी पंचवटी एक्सप्रेसने हे आंदोलक मोर्चेकरी मनमाड रेल्वे स्थानकाकडे जात असतानाच पावणे सहा वाजता त्यांना पोलिसातर्फे रेल्वे गेटजवळ अडविण्यात आले. आंदोलकांची समजूत काढण्यात आली, मात्र आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत आम्ही काही गुन्हेगार नाही किंवा अन्याय करणारे नाही, आम्ही आमच्या न्याय्य हक्कांसाठी जात असताना ही अडवणूक का? असा प्रश्न मनमाडच्या आगारातील संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा: नाशिक : एसटी संपामुळे सिटीलिंक मालामाल

दरम्यान, पोलिसांवर दबाव असल्याने त्यांनी पुढे जाण्याची परवानगी दिली नसल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. या संपकरी कर्मचाऱ्यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले या आंदोलकांना साडेतीन तास पोलिस स्थानकात स्थानबद्ध करून ठेवण्यात आले त्यानंतर या २१ कर्मचाऱ्यांना समज देऊन त्यांची सुटका करण्यात आली

हेही वाचा: नाशिक : भरतीसाठी शासन मान्यता घेणार

loading image
go to top