लॉकडाउनमुळे दुग्ध व्यावसायिकांच्या अडचणीत भर

dairy farmers
dairy farmersGoogle
Summary

लॉकडाउनमुळे ग्राहकांची बिले, अल्प प्रमाणात दूध विक्री, हॉटेल, मॉल या सेवा बंद असल्यामुळे दुधाची विक्री होत नसल्यामुळे अनेक दुग्ध व्यावसायिक डबघाईस आले आहेत

इगतपुरी (जि. नाशिक) : लॉकडाउन काळात शेतीला अत्यंत महत्त्वाचा समजला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे (dairy farmers) पाहिले जाते. परंतु लॉकडाउनमुळे (Lockdown) ग्राहकांची बिले, अल्प प्रमाणात दूध विक्री, हॉटेल, मॉल या सेवा बंद असल्यामुळे दुधाची विक्री होत नसल्यामुळे अनेक दुग्ध व्यावसायिक डबघाईस आल्याचे कृष्णा डेअरीचे संचालक सोमनाथ गव्हाणे यांनी सांगितले. (many dairy farmers facing financial crisis due to lockdown)

लॉकडाउन काळात राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सर्वच ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आल्यामुळे औद्योगिक वसाहती, हॉटेल, मॉल, स्वीटचे दुकाने, तसेच दुग्धजन्य पदार्थांचे दुकाने बंद असल्यामुळे दुधाची पाहिजे तेवढ्या प्रमाणात विक्री झाली नाही. तसेच औद्योगिक वसाहती बंद असल्यामुळे यामधील कामगार वर्ग घरीच असल्यामुळे विक्री केलेल्या दुधाची बिले तीन महिने उशिराने मिळणार असल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले.

तसेच अनेक ग्राहकांचे हॉटेल, चहाची दुकाने, तसेच मालवाहू साधने, रिक्षा बंद असल्यामुळे या ग्राहकांकडून दुधाचे बिल येणे मुश्कील झाले आहे. सध्या ग्रामीण भागात शेतीच्या कामांसाठी लागणारे बी-बियाणे तसेच खते, रोग प्रतिबंधक औषधे आदी वस्तू आणण्यासाठी शेतकरी दुग्ध व्यवसायिकांना मुश्कील झाले आहे. आर्थिक संकटाचा सामना कसा करायचा, असा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा टाकला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असून, पावसाळा सुरु होण्यापूर्वी कमीत-कमी एक महिना पुरेल इतका चारा साठवून ठेवणे गरजेचे आहे. असे असताना आर्थिक टंचाईमुळे ते शक्य नसल्यामुळे जनावरांवरदेखील उपासमारीची वेळ येऊ शकते. शासनाने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील दुग्ध व्यावसायिक शेतकरी करीत आहे.

dairy farmers
VIDEO : महापौर साहेब दार उघडा, उत्तर द्या....

लॉकडाउन काळात कंपन्या, हॉटेलसह अनेक महत्त्वाची दुकाने बंद असल्यामुळे दूधविक्री व्यवसायावर परिणाम झाला. ग्राहकांकडून थकीत बिले मिळण्यास विलंब होत असल्यामुळे जनावरांचा चारा तसेच शेतीउपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने मदत करावी.

- सोमनाथ गव्हाणे, दुग्ध व्यावसायिक.

(many dairy farmers facing financial crisis due to lockdown)

dairy farmers
दिलासादायक! मेमध्ये प्रथमच 30 पेक्षा कमी मृत्‍यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com