बाजार समित्या राहणार बंद; काय म्हणाले छगन भुजबळ..

छगन भुजबळ : ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पाच्या कामाला द्यावी गती
chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट व्हावी म्हणून बाजार समित्या काही दिवस बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले, तसेच ऑक्सिजनचा साठा करण्यावर भर देण्याबरोबर ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पांच्या कामांना गती देण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

छगन भुजबळ : ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पाच्या कामाला द्यावी गती

भुजबळ फार्म येथे झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे उपस्थित होते.

chhagan bhujbal
नाशिक जिल्ह्यातील डोंगराळ भागात भुकंपाचे धक्के; नागरिकांत भीती

रेमडेसिव्हिरचा अधिक वापर टाळा

जिल्ह्यातील खाटा, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरचा पुरवठा सुरळीत असून, रेमडेसिव्हिरचा गरजेपेक्षा अधिक वापर टाळण्यात यावा. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णालयात आवश्यक ते मुनष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मोहिमेत कुणी वंचित राहणार नाही यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना श्री. भुजबळ यांनी केली.

chhagan bhujbal
शिवसेना व्यापारी सेनेच्या जिल्हाध्यक्षांची आत्महत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना केअर सेंटर अधिक सक्षम करण्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे, जेणेकरून रुग्णांना त्वरित व वेळेत उपचार मिळणे शक्य होईल. तसेच सर्व कोरोना रुग्णालयांचे ऑक्सिजन वापराचे परीक्षण पूर्ण करण्यात आले असून, रेमडेसिव्हिरचा पुरवठा सर्व रुग्णालयांना सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com