esakal | परवानगीविना विवाह सोहळा; प्रशासनाची दंडात्मक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

police action

विवाहस्थळी सामाजिक अंतर व मास्क न घातल्याबद्दल सिडको मनपा विभाग व अंबड पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने कारवाई करून एकूण तीस हजारांचा दंड आकरण्यात आला.

परवानगीविना विवाह सोहळा; प्रशासनाची दंडात्मक कारवाई

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको : विनापरवानगी विवाहस्थळी सामाजिक अंतर व मास्क न घातल्याबद्दल सिडको मनपा विभाग व अंबड पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने कारवाई करून एकूण तीस हजारांचा दंड आकरण्यात आला. (Marriage ceremony without permission unitive action of the administration)

सर्व शासकीय नियम धाब्यावर

सोमवारी (ता.२४) कोविड (Covid 19) प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभाग व अंबड पोलिस प्रशासनामार्फत सिडको विभागातील अश्विननगर येथे कोणतीही परवानगी न घेता घरगुती विवाह समारंभ चालू होता. विवाहाचे ठिकाणी मास्कचा (Mask) वापर न केल्याबाबत ३० नागरिकांना १५ हजार, तसेच सुरक्षित अंतर (Social distancing) नियमाचे पालन न करणाऱ्या वर, वधु पक्ष व केटरिंग सर्व्हिसेसच्या मालकांवर प्रत्येकी ५००० रुपयेप्रमाणे १५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक राकेश शेवाळे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, अधीक्षक दशरथ भवर, बी. आर. बागूल, राजेश बोरीसा, अशोक दोंदे, अविनाश गांगुर्डे, संतोष बागूल यांनी सदर कारवाई केली.

हेही वाचा: पाकिस्तान व्हिसा देत नव्हता, मग भारताने उचललं 'हे' पाऊल

''अश्विनगर येथे विनापरवानगी लग्नसोहळा सुरू असून तेथे नियमांचे पालन होत नसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सदर कारवाई करून तीस हजार रुपये दंड आकारण्यात आला.''

- संजय गांगुर्डे, स्वच्छता निरीक्षक, सिडको

(Marriage ceremony without permission Punitive action of the administration)

हेही वाचा: जातीवाचक बोलणं युविकाला पडलं महागात...