Nashik Crime News : विवाहितेवर बलात्कार; संशयितास अटक

crime news
crime newsesakal

नाशिक : कौटुंबिक ओळखीतून घरी पोचलेल्या एकाने विवाहितेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताकडून मागणी वाढल्याने दोघांमध्ये वाद होऊन महिलेचा मोबाईल फुटल्याने हा वाद पोलिसात पोचला.

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. (Married woman raped Suspect arrested Nashik Crime News)

हरिदास काळू गावित (३०, रा. वाघ्याची वाडी, हरसूल, ता. पेठ), असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीनुसार, संशयित आणि पीडिता यांच्यात कौटुंबिक ओळख असून, दोघेही विवाहीत आहेत. महिलेशी गेल्या जानेवारीत संशयिताची भेट झाली होती.

या वेळी महिलेने त्यास घरी बोलावले असता, संशयिताने घरी कुणी नसल्याची संधी साधत महिलेवर बळजबरीने बलात्कार केला. स्वत: घरी बोलाविलेले असल्याने महिलेने अत्याचार सहन केला. मात्र, त्यानंतर संशयिताचे येणे जाणे वाढले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

crime news
Jalgaon Crime News : मित्रांच्या पार्टीत गेलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह; तरवाडे येथील घटना

महिलेचा पती घराबाहेर पडताच संशयित तिच्या घरी येऊन दमदाटी व मारहाण करून नैसर्गिक व अनैसर्गिक संबंध ठेवू लागला. यामुळे वैतागलेल्या महिलेने रविवारी (ता. २६) त्यास नकार देत कानउघाडणी केली असता संतप्त संशयिताने तिला मारहाण केली. तसेच, तिचा मोबाईल फोडल्याने हा वाद पोलिसात पोचला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.

crime news
Crime News : 9 वर्षांच्या 'इन्स्टा क्वीन'ने गळफास लावून केली आत्महत्या; वडील म्हणाले होते...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com