Corona बदलत्या व्हेरिएंटविरोधात त्रिसूत्रीच ठरणार उपयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mask Sanitizer

Corona बदलत्या व्हेरिएंटविरोधात त्रिसूत्रीच ठरणार उपयुक्त

नाशिक : गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे (Corona) अवघे जग धास्तावलेले असताना, पुन्हा कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे रूग्णसंख्या वाढू लागली आहे. त्याविरोधात नागरिकांनी चिंता करण्याऐवजी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटाईजरचा वापर या त्रिसूत्रीचा वापरच रामबाण उपाय आहे. त्यामुळे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढविणारी असली तरी खबरदारी म्हणून नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, तसेच या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे. Nashik News

गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा कोरोनाच्या नवीन व्हायरंट संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. गत दोन वर्षांतील पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेमुळे अतिशय भयानक अशी परिस्थिती नागरिकांनी अनुभवली असल्याने, पुन्हा वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येने चिंतेची भर घातली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शहर-जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढते आहे. आजमितीस जिल्ह्यात १५८ कोरोनाची रुग्णसंख्या आहे. महिन्याभरापूर्वी रुग्णसंख्या नगण्य होती. मात्र, दिवसांगणिक वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणाही तत्परतेेने उपाययोजनेसह सज्ज आहे. असे असले तरी, नागरिकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सींग व हातांना सॅनिटाईजरचा वापर करणे या तीन सूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आला आहे.

हेही वाचा: Corona 4th Wave: ICMR च्या तज्ज्ञांचे मोठं विधान; म्हणाले, आता अधिक...

''कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे रुग्णसंख्या वाढते आहे. प्रादूर्भाव वाढू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सींग, हातांची स्वच्छता यांचा अवलंब केल्यास कोरोनापासून बचाव होऊ शकतो. आरोग्य यंत्रणाही याबाबत सज्ज असून, जनजागृतीवर भर दिला जात आहे.'' - डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक जिल्हा रुग्णालय.

हेही वाचा: Corona : भय संपलेले नाही! WHO ने दिला इशारा

Web Title: Mask Sanitization And Vaccination Is Useful For Fight With Corona Variants

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top