…अन्‌ आफ्रिकन नागरिक झाला भावनावश; मेट्रन मुठाळ यांना देऊ केली अंगठी

matron at Bytco Hospital Asha Muthal rejected the ring offered by an African national
matron at Bytco Hospital Asha Muthal rejected the ring offered by an African national

नाशिक रोड : नाशिकमध्ये कामानिमित्त आलेल्या आफ्रिकन नागरिकावर (African national) यशस्वी उपचार झाल्यानंतर त्याने आफ्रिकेत परतताना दिलेली अंगठी बिटको हॉस्पिटलमधील मेट्रन आशा मुठाळ यांनी नाकारली. बिटको हॉस्पिटल (Bytco Hospital) व वैद्यकीय क्षेत्रात सध्या हा आदर्श चर्चेचा विषय ठरत आहे.

यशस्वी उपचारानंतर बिटको हॉस्पिटलमधून निरोप घेताना आरोग्य कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आफ्रिकन नागरिकाचे डोळे पाणावले. बिटको हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी या नागरिकाचा सत्कार करून त्याला निरोप दिला. आफ्रिकन नागरिक सिको मेलेनी ट्रोर नाशिकला काही कामानिमित्त आला होता. त्याला कोरोनाची लागण झाली. सिको यांच्यावर १५ दिवस बिटको कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. या व्यक्तीचे मेट्रन आशा मुठाळ, डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. सागर तांबोळी, डॉ. रत्नाकर पगारे यांच्याशी भावनिक संबंध जुळले. वेळेवर गोळ्या देऊन त्याची घरासारखी काळजी घेतली.

भारतीय खाद्यपदार्थ सूट न झाल्याने स्विगीवरून येथील कर्मचाऱ्यांनी खाद्यपदार्थ मागविले होते. भात आणि टोमॅटो सॉसचे जेवण या व्यक्तीला आवडायचे. या काळात मेट्रन आशा मुठाळ यांनी त्याची खास काळजी घेतली. १४ दिवसांनंतर पुन्हा त्यांची तपासणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आल्यामुळे बिटको हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. उपचार केल्याबद्दल आणि आजारपणात धीर दिल्याबद्दल आफ्रिकन नागरिकाने बिटको कोविड सेंटरमधील मेट्रन आशा मुठाळ यांना जाड चांदीची अंगठी सप्रेम भेट देऊ केली. भाषेची अडचण येत होती, म्हणून मोबाईलमध्ये ट्रान्सलेट करून या व्यक्तीने आपण माझी घरासारखी काळजी घेतली. मला धीर दिला, म्हणून मी आपल्याला सप्रेम भेट म्हणून अंगठी देत आहे, असे सांगितले. मात्र, आशा मुठाळ यांनी हा माझ्या नोकरीचा एक भाग होता, असे सांगून त्यांना अंगठी परत दिली. आफ्रिकन व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आले व ते भावूक झाले. या भावनिक प्रसंगामुळे बिटको हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपण करीत असलेल्या कामाचे समाधान आणि आनंद मिळाला. या व्यक्तीला बरे करण्यासाठी डॉ. मकरंद राणे, दीपक लवटे व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

matron at Bytco Hospital Asha Muthal rejected the ring offered by an African national
नव्या वर्षात भारतीयांना 5G ची भेट! पहिल्यांदा 13 शहरात मिळणार सेवा

आफ्रिकन नागरिकाची घरासारखी विचारपूस करता आली, याचा आनंद आहे. जाताना त्याने दिलेली भेट मी स्वीकारली नाही. मात्र, काम केल्याचा आनंद झाला आणि भारतीय आरोग्य व्यवस्था परदेशी नागरिकांची कशी काळजी घेते, हा संदेश आफ्रिकेत पोहोचवता आल्याचे समाधान आहे.
- आशा मुठाळ, मेट्रन, बिटको कोविड सें

matron at Bytco Hospital Asha Muthal rejected the ring offered by an African national
Jio चा 'हॅपी न्यू इयर 2022' प्लॅन, 365 दिवस मिळाणार खास बेनिफिट्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com