Nashik : यांत्रिक झाडूने तासाला 7 किलोमीटर रस्त्यांची सफाई

Mechanical Broom
Mechanical Broomesakal

नाशिक : केंद्रीय निधीतून मिळणार असलेल्या यांत्रिक झाडूच्या पाहणीनंतर समितीने यांत्रिक झाडूच्या व्यवहार्यतेविषयीची अहवाल महापालिका आयुक्तांना दिला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे (Solid Waste Management Department) संचालक डॉ. आवेश पलोड आणि यांत्रिकी विभागाने कार्यकारी अभियंता बाजीराव माळी महापालिकेतर्फे भावनगर (गुजरात) येथे यांत्रिकी झाडूची पाहणी करण्यासाठी गेले होते. पाहणीनंतर अहवाल महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (NMC commissioner ramesh pawar) यांच्याकडे सादर केला. (Mechanical broom cleans 7 km of roads per hour Nashik NMC News)

केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च केला जाणार आहे. यांत्रिक झाडूसाठी केंद्र शासनाकडून निधी मिळणार आहे. झाडूची किंमत २ कोटीच्या आसपास असेल. झाडूला त्यासाठी महापालिकेला खर्च नसला कालांतराने त्यामध्ये काही बिघाड झाल्यास देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. नाशिक शहरात २ हजार १५० किलोमीटर लांबीचे रस्ते असून, यातील ९० किमी रिंगरोड व बाह्यवळण रस्त्यांची सफाई यांत्रिकी झाडूद्वारे करता येणार आहे. यांत्रिकी झाडू दोन कोटी सहा लाखाचा खर्च असला तरी, झाडू खरेदी ऑपरेटिंग व पाच वर्षासाठी देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा रुपये खर्चाचा विषय असल्याने त्याविरोधात विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून महासभेवर गदारोळ झाला होता.

Mechanical Broom
चारा घेण्यासाठी गेलेल्या महिलेला वीज चाटून गेल्याने जखमी

महापालिकेत मनुष्यबळाचा तुटवडा आहे. नवीन भरती नाही, सफाई कामगार भरती नाही. अशा काळात नोकर भरतीचा आढावा घेतला जात असतानाच मनुष्यबळ बचतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या झाडूबाबत महापालिका प्रशासनाला झाडू मदत होणार आहे. केंद्राचा निधी असल्याने महापालिकेच्या तिजोरीवर भार येणार नसल्याने महापालिका आयुक्त रमेश पवार यांना देखभाल दुरुस्तीच्या नियोजनाचा विचार करून तसेच व्यवहार्यता अहवाल पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे.

Mechanical Broom
Nashik : प्रारुप मतदार याद्यांची विक्री सुरु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com