esakal | बिल मागितल्याचा आला राग; मेडिकल दुकानदाराकडून मारहाण

बोलून बातमी शोधा

medical bill
बिल मागितल्याचा आला राग; मेडिकल दुकानदाराकडून मारहाण
sakal_logo
By
टीम ईसकाळ

लासलगाव (जि.नाशिक) : कसबे सुकेणे येथील कोविड पॉझिटिव्ह रुग्णाला बिलामध्ये तफावत आढळल्याने मेडिकलवाल्याकडे विचारणा केली असता दोघांमध्ये बाचाबाची होऊ हाणामारी झाली. याप्रकरणी लासलगाव पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. काय घडले नेमके?

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

मेडिकल दुकानदाराकडून मारहाण

कसबे सुकेणे येथील मोरे यांचे कुटुंब पॉझिटिव्ह आल्याने लासलगाव ग्रामपंचायतीजवळील खासगी कोविड केंद्रामध्ये उपचार घेत होते. कातकाडे हॉस्पिटलसमोरील संजीवनी मेडिकलमधून घेतलेल्या औषधांचे बिल मागितले असता मेडिकल संचालक गणेश फड यांना राग आला. बिलामध्ये एक हजार रुपयाचा फरक असल्याने रुग्णांचे नातेवाईक व गणेश फड यांच्यात वादावादी झाली. गणेश फड यांच्या मेडिकलमधील कामगार व इतर तीन जणांनी अशा पाच जणांनी मिळून रुग्णाला मारहाण केली. तसेच एका महिलेला धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. देवीदास मोरे यांच्या फिर्यादीवरून गणेश फड व इतर जणांविरोधात लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गणेश फड यांच्या पत्नीनेही परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा: 5 वेळा हृदयविकाराचा झटका, मधुमेह असूनही 92 वर्षीय आजोबांचा लढा यशस्वी!