
Water Planning : पाणी नियोजनाबाबत प्रधान सचिवांकडे आज बैठक
नाशिक : जून महिन्यात पॅसिफीक समुद्रात संभावित ‘अल निनो‘ वादळामुळे लांबणाऱ्या पावसाळ्यावर तोडगा काढण्यासाठी कपात केली जाणार आहे. त्याच संदर्भात नियोजनाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव मंगळवारी (ता.२८) मंत्रालयात बैठक घेणार आहे.
बैठकीतील सूचनेनुसार पाणीकपातीचे प्रमाण ठरणार आहे. तूर्त महापालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार पाणी कपातीचे नियोजन करण्यात आले आहे. (Meeting with Principal Secretary today regarding water planning nashik news)
संभावित पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना शासनाकडून महापालिकेला प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने महापालिका मुख्यालयात पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली.
आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती सर्वसाधारण स्थितीपेक्षा गंभीर होऊ शकते. म्हणून पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या. त्याअनुषंगाने प्रधान सचिवांकडे बैठक होणार आहे.
हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार
शासनाच्या सूचना
- जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यात पाणीटंचाईसाठी कृती आराखडा तयार करावा.
- पाणीटंचाई निवारांनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहील यानुसार नियोजन करावे.
- उन्हाळ्यासह जुलै व ऑगस्ट या कालावधीत त्यांचे निवारण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा.
- पाण्याच्या स्रोतांचे जतन करावे.
- पाणीसाठ्याचा आढावा घेऊन आणि कपातीचे नियोजन करावे.
- पाणीटंचाई काळा रेन वॉटर हार्वेस्टिंग व कॅच द रेन पिण्याचे पाणी स्रोत बळकटीकरण योजना अभियान स्वरूपात राबवावी.
- वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करावे.
- हातपंप व विंधन विहिरी कार्यरत कराव्या.