Nashik News : उगाव रेल्वे स्थानकावर मेमू रेल्वे थांबेना; उगावकरांचा संताप | Memu train does not stop at Ugav railway station Wrath of ugaon people Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MEMU Train

Nashik News : उगाव रेल्वे स्थानकावर मेमू रेल्वे थांबेना; उगावकरांचा संताप

Nashik News : मध्य रेल्वेच्या उगाव रेल्वे स्थानकावर देवळाली भुसावळ पॅसेंजर अथवा मेमू रेल्वेगाडीस थांबा देण्याच्या मागणीला वर्षपूर्ती होऊनही रेल्वे थांबली नाही.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे सहा महिन्यात चार वेळा निवेदने देऊनही कार्यवाही न झाल्याने उगावकरांमध्ये संतापाची भावना आहे. (Memu train does not stop at Ugav railway station Wrath of ugaon people Nashik News)

मध्य रेल्वे मार्गावरील उगाव रेल्वे स्थानकावर कोरोना लॉकडाउनपूर्वी मुंबई, भुसावळ, देवळाली, भुसावळ पॅसेंजर,इगतपुरी-मनमाड शटल या रेल्वेगाड्यांना थांबा होता.

त्यामुळे परिसरातील उगाव, शिवडी, खेडे, वनसगाव, सोनेवाडी खुर्द, सोनेवाडी बु, पानेवाडी या भागातील नागरिक, विद्यार्थी तसेच, हंगामी कामगार, व्यापारी अशा घटकांना मुंबई, कल्याण, ठाणे, तसेच भुसावळ, नागपूर, जळगाव शहराला जाण्यासाठी कमी खर्चात चांगली सेवा उपलब्ध होती. मात्र कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये सर्वच सेवा बंद होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली जात होती. त्यामुळे मनमाड, इगतपुरी शटल ऐवजी मनमाड इगतपुरी मेमू रेल्वेगाडी सुरु करण्यात आली त्या गाडीस उगाव येथील रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला नाही.

त्यानंतर प्रवाशांच्या रेट्याने सुरु केलेल्या देवळाली, भुसावळ पॅसेंजरलाही उगाव रेल्वे स्थानकावर थांबा नाकारण्यात आला. सहा महिन्यांत लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन देण्यात आले.

मात्र, अद्यापही त्याबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे उगाव, शिवडी, खेडे, वनसगाव, सोनेवाडी खुर्द, सोनेवाडी बु, पानेवाडी भागातील ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे.

टॅग्स :Nashikrailway