
MHT CET 2023 : एमएचटी सीईटी परीक्षा नोंदणीची 'या' तारखेपर्यंत मुदत; या आहे महत्त्वाच्या तारखा..
नाशिक : बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी- २०२३ (MHT CET 2023) या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी अर्जप्रक्रिया बुधवारी (ता. ८) सुरू झाली. (MHT CET 2023 Exam Registration deadline is April 7 nashik news)
पात्र विद्यार्थ्यांना येत्या ७ एप्रिलपर्यंत ऑनलाइन परीक्षा अर्ज भरता येणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यासंदर्भात सूचनापत्र जारी करून एमएचटी-सीईटी २०२३ परीक्षेची नोंदणी सुरू झाल्याचे जाहीर केले आहे.
अभियांत्रिकी (बी.ई./बी.टेक.), औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्मसी), कृषी (बी. एस्सी, ॲग्री.) या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ही परीक्षा होणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम), तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) अशा दोन ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
मेमध्ये परीक्षा
एमएचटी-सीईटी परीक्षा मेमध्ये होईल. यामध्ये पहिल्या टप्यात पीसीएम ग्रुपची परीक्षा ९ ते १३ मे यादरम्यान, तर पीसीबी ग्रुपची परीक्षा १५ ते २० मेदरम्यान होईल. संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) या परीक्षेत विद्यार्थ्यांना सत्रनिहाय परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. परीक्षेची तारीख, वेळ व परीक्षा केंद्राचा पत्ता प्रवेशपत्रावर नमूद केला जाईल. परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर केला जाईल.
महत्त्वाच्या तारखा अशा-
एमएचटी-सीईटी परीक्षा नोंदणीची मुदत---------७ एप्रिल
विलंब शुल्कासह नोंदणीची मुदत--------------८ ते १५ एप्रिल
ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत--------------१६ एप्रिल