Dr. Anil Avchat
Dr. Anil Avchatesakal

महाराष्ट्राचा बहुआयामी तारा निखळला - मंत्री छगन भुजबळ

नाशिक : चतुरस्त्र लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट (Dr Anil Avchat) यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठा धक्का बसला असून महाराष्ट्राचा बहुआयामी तारा निखळला अश्या शब्दात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

आपल्या शोकसंदेशात मंत्री भुजबळ म्हणाले की, डॉ. अनिल अवचट यांनी दलित, मागासवर्गीय, मजूर, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपूल लेखन केले आहे. त्यांनी सुरू केलल्या मुक्तांगण या संस्थेच्या माध्यमातून हजारो लोक हे व्यसनापासून मुक्त झाले. त्यामुळे फक्त केवळ साहित्य विश्वातच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

Dr. Anil Avchat
सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांचे निधन | Nashik

डॉ. अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहताना श्री भुजबळ म्हणाले की डॉ. अवचट यांच्या निधनाने एका हरहुन्नरी लेखक, आणि सामाजिक कार्यकर्ता महाराष्ट्राने गमावला आहे. त्यांच्या निधनाने अवचट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय अवचट कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो. यावेळी भुजबळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Dr. Anil Avchat
जनतेच्या सहकार्याने कोरोनावर मात करू : पालकमंत्री छगन भुजबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com