नाशिक : सटाण्यातून बेपत्ता झालेली मुलगी सापडली पुण्यात

police
policeesakal

सटाणा (जि. नाशिक) : शहरातून सोमवारी (ता. १३) सायंकाळी सहापासून अचानक बेपत्ता झालेल्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा तपास लावण्यात यश आले आहे. याप्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार देण्यात आली होती. सोमवारी सायंकाळपासून सटाणा बसस्थानकापासून सुरू झालेल्या या थरारक घटनेचा शेवट पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकात झाल्याने मुलीच्या कुटुंबियांसह सटाणा पोलिसांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

अचानक बेपत्ता झाल्याने अपहरणाचा संशय

शहरातील राजमाता अहिल्याबाई चौकात राहणारी व इयत्ता आठवीत शिकणारी तेरा वर्षीय विद्यार्थिनी सोमवारी सायंकाळी घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली. रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेही आढळून येत नसल्याने तिचे अपहरण तर झाले नाही ना, या भीतीने कुटुंबियांनी सटाणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. यानंतर पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. तर तिच्या नातेवाईकांनी देखील शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आपल्या बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला.

police
मनसेची एकी कागदावर की प्रत्यक्षात? राज ठाकरे दौऱ्यावर चर्चा

सोमवारी सायंकाळी ती सटाणा बसस्थानकात प्रवेश करतानाचे आणि बसस्थानकाच्या फलाटालगत असलेले फुटेज तपासले असता संबंधित बेपत्ता मुलगी सायंकाळी सातला सटाणा - मालेगाव बसमध्ये बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. तिच्या नातेवाईकांनी तातडीने मालेगाव गाठत तेथील दोन्ही बसस्थानकांचे रात्री आठ ते साडेआठ दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात संबंधित मुलगी मालेगावहुन पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बसल्याचे स्पष्टपणे दिसले. यानंतर कुटुंबियांनी नाउमेद न होता थेट पुण्याचे शिवाजीनगर बसस्थानक गाठले. शिवाजीनगर बसस्थानकात परिसरात तिचा सर्वत्र शोध घेतला असता शेवटच्या फलाटावरील कोपऱ्यात संबंधित बेपत्ता मुलगी आढळून आल्याने कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला.

या वेळी कुटुंबियांनी तिला ताब्यात घेतले आणि सटाणा पोलिसांना माहिती दिली. मात्र, तिने घरातून निघून जाण्याचा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत माहिती कळू शकली नाही.

police
मनसेची एकी कागदावर की प्रत्यक्षात? नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com