नुकसान भरपाईत बागलाणची चेष्टा - आमदार दिलीप बोरसे यांचा आरोप

MLA Dilip Borse
MLA Dilip Borseesakal

सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यात २०२०- २०२१ मध्ये अवकाळी पावसामुळे अर्ली द्राक्षांचे ५ हजार टनापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. महाविकास आघाडी शासनाने अवघ्या दीड कोटी रुपयांची तुटपुंजी मदत देऊन बळीराजाची चेष्टा केली आहे. बागलाण तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्‍यांवर शासनाने नुकसान भरपाईबाबत अन्याय केल्याची भावना बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी विधानसभेत व्यक्त केली आहे.

आमदार बोरसे म्हणाले, माझ्या बागलाण तालुक्यात अर्ली द्राक्षाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्‍यांची संख्या मोठी आहे. २०२०- २१ मध्ये तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बागलाण तालुक्यातील शेकडो द्राक्ष उत्पादकांचे ५ हजार टनाहून अधिक पिकाचे नुकसान झाले होते. महसूल यंत्रणेने या सर्व नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे केले तेव्हा नुकसानीचा आकडा ५०० ते ६०० कोटी रूपयांचा होता. प्रत्यक्षात, मात्र बागलाणमधील नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना शासनाने केवळ दीड कोटी रुपयांची तुटपुंजी मदत केली आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाने द्राक्ष व डाळिंबाचे अतोनात नुकसान केले आहे. आघाडी शासनाने याही नुकसानग्रस्त शेतकऱ्‍यांना दमडीही दिली नाही. ६, ७ मार्चला झालेल्या अवकाळी पाऊस व तुरळक गारपिटीमुळे पुन्हा द्राक्ष, कांदा, गहू व हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून मदत तर नाहीच नाही साधे पंचनामेही करण्यात आलेले नसल्याचे आमदार बोरसे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

MLA Dilip Borse
नाशिक : शेतकऱ्याला द्राक्ष व्यापाऱ्याने घातला 3 लाखांचा गंडा

शासन मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची आर्थिक मदत शासन माझ्या बागलाणच्या शेतकऱ्‍यांना देणार का, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तुम्ही महसूल विभागाला द्याल का, असा प्रश्‍नही आमदार बोरसे यांनी विधानसभेत उपस्थित केला.

MLA Dilip Borse
नाशिक : पोलिस व भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये 'तू तू मै मै'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com