Nashik News: आमदार असल्यासारखच बोलायचे : दिलीप बोरसे

Many houses were damaged in Mahadar area on Sunday due to strong winds and heavy rains.
Many houses were damaged in Mahadar area on Sunday due to strong winds and heavy rains.esakal

Nashik News : ग्रामस्थांनो तुमचे कुठलेही काम असल्याने थेट संबंधित अधिकाऱ्यास फोन लावून आमदार बोलतोय असे सांगायचे. संबंधित अधिकाऱ्यांना जर काम केले नाही तर मग मला सांगा. पण अधिकाऱ्याशी बोलताना बेधडकपणे आमदार बोलत असल्याचे सांगत आपल्या समस्या मांडा अशी समजूत आमदार दिलीप बोरसे यांनी नाराज ग्रामस्थांनी काढली. (mla dilip borse Visited victims of Mahadar nashik news)

बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील साल्हेर परिसरात पायरपाडा महादर भाटंबा साल्हेरवाडी या भागामध्ये रविवारी (ता.४) झालेल्या वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार बोरसे यांनी दिले होते.

त्यानंतर गुरुवारी (ता. ८) या नुकसानग्रस्त भागात जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी घटना घडल्यानंतर तत्काळ तुम्ही येणे अपेक्षित असल्याचे बोलत ग्रामस्थांनी आपली नाराजी आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे व्यक्त केले.

आमदार बोरसे यांनी मोठे महादर येथे नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन त्यांना तत्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले. तसेच वादळात पडलेले वीजेचे पोल तत्काळ बदलण्याच्या सूचना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यासह रविवारी (ता.११) येथील ग्रामस्थांच्या समस्या तत्काळ सोडविण्याच्या दृष्टीने सर्व विभागप्रमुख यांच्या बैठकीचे देखील आयोजन केले. महादर येथील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामध्ये घराचे पत्रे व घराचे नुकसान झालेले कुटुंबाला आमदार यांनी तात्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Many houses were damaged in Mahadar area on Sunday due to strong winds and heavy rains.
Nashik News: निफाडला शासन आपल्या दारी मोहीम! विविध शासकीय योजनांच्या लाभार्थींना दाखल्यांचे वाटप

नुकसान पाहणी दौऱ्यानंतर श्री. बोरसे यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांची नाराजी व्यक्त करत तुम्ही नुकसान झाल्यावर तत्काळ भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना करणे अपेक्षित होत असे सांगितले.

यावर आमदार बोरसे यांनी नाराज ग्रामस्थ यांची समजूत काढत ‘तुमचे कुठलेही काम असो, काहीही असो तुम्ही थेट अधिकाऱ्यांना फोन लावायचा आणि सांगायचे मी आमदार बोलतो, तुमची काही समस्या असेल ती आमदार म्हणूनच अधिकाऱ्यांशी बोलायची. अधिकाऱ्यांनी तुम्हाला प्रतिसाद न दिल्यास आणि उडवाउडवीचे उत्तरे दिल्यास मला कळवा असे सांगितले.

यावेळी शंकर ठाकरे, सुभाष ठाकरे, नारायण भोये, हिरालाल बाविस्कर, संपत पवार, रामदास गवळी, योगेश पवार, सुरेश पवार, मधुकर भोये आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

"वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे महादर येथे बऱ्याच कुटुंबाच्या घराची पडझड होऊन पत्रे उडून गेल्याचे कळताच संबंधित विभागांना नुकसानग्रस्त कुटुंबांच्या घराचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र मुंबईला मीटिंग असल्यामुळे मी तत्काळ पीडित कुटुंबापर्यंत पोचू शकलो नाही. आता साल्हेर भागाचा दौरा करत आहे." - दिलीप बोरसे, आमदार

Many houses were damaged in Mahadar area on Sunday due to strong winds and heavy rains.
Nashik News: मांडवड आणि गिरणानगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संतोष जाधव निलंबित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com