"आमदारां"ना पाठवले स्वतंत्र विलगीकरण खोलीत! आणखी सात जणांचे स्वॅबही तपासणीसाठी

maulana mufti.png
maulana mufti.png

नाशिक / मालेगाव : आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना दोन दिवस राहत्या घरी क्वारंटाइन केल्यानंतर शुक्रवारी (ता.3) त्यांना शहरातील अज्ञात ठिकाणी स्वतंत्र खोलीत क्वारंटाइन करण्यात आले. येथील मदनीनगर विलगीकरण कक्षात शुक्रवारी सात जणांना पोलिस बंदोबस्तात दाखल करण्यात आले. आमदार मौलाना मुफ्ती यांच्यासह या आठही जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्याचे आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. 

क्वारंटाइन करत तपासणीसाठी स्वॅब घेतले
आमदार मौलाना मुफ्ती दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. मात्र मार्चमध्येच त्यांनी दिल्ली व परिसराचा दौरा केल्याने तसेच जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे नाव प्राप्त झाल्याने त्यांना क्वारंटाइन करत तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आल्याचे महापालिकेचे सहाय्यक आरोग्याधिकारी डॉ. भीमराव त्रिभुवन यांनी सांगितले. आठही संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हा तपासणी अहवाल येण्याची शक्‍यता आहे. येथील सामान्य रुग्णालयात  नव्याने एक संशयित दाखल झाला. 

 महापालिकेने खरेदी केले आठ नवीन फवारणी यंत्र 
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने शहरात व्यापक प्रमाणात जंतुनाशक फवारणी व धुरळणी सुरू केली आहे. सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांनीही प्रशासनाला या कामात मदत केली. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टर उपलब्ध करून दिले. पूर्व भागातील दाट लोकवस्तीत ट्रॅक्‍टर नेताना व फवारणी, धुरळणी करताना अडचणी येत होत्या. त्यासाठी महापालिका प्रशासनाने शुक्रवारी नवीन आठ फवारणी यंत्र खरेदी केले. या यंत्रांना शंभर मीटरची केबल असल्याने दूरपर्यंत फवारणी करणे शक्‍य होणार आहे. शनिवारी हे फवारणी यंत्र शहरात दाखल होणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com