Mogre Crime case : शहर गुन्हे शोध पथके संशयितांच्या मागावर

Crime News
Crime Newsesakal

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील रोहिणी इंडस्ट्रीजचे सीईओ योगेश मोगरे यांच्या खून प्रकरणी शहर गुन्हे शाखेची पथके राज्यातील काही शहरांसह परराज्यात संशयितांचा शोध घेत आहेत.

मोगरे यांच्या खुनामागील कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांची पथके संशयितांच्या मागावर असून, तपास सकारात्मक दिशेने सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे. (Mogre Murder case City crime investigation team on trail of suspects nashik news)

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Crime News
Dhule Crime News : प्लॅस्टिक कचऱ्याआडून गुटखा तस्करी; धुळे एलसीबीची कारवाई

गुरुवारी (ता. २३) रात्री दहाच्या सुमारास पाथर्डी फाटा येथील हॉटेल अंगणसमोर अज्ञात संशयितांनी योगेश मोगरे यांच्यावर खुनी हल्ला केला. यात गंभीररीत्या जखमी मोगरे यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

संशयितांनी हल्ल्यानंतर मोगरे यांची किया कार घेऊन महामार्गाने मुंबईच्या दिशेने पलायन केले होते. दुसऱ्या दिवशी सदरील किया कार वाडीवऱ्हे शिवारात महामार्गावर सापडली होती. दरम्यान, याप्रकरणी अद्याप पोलिसांच्या हाती ठोस माहिती मिळालेली नाही.

परंतु, शहर गुन्हे शाखेची विविध पथके राज्यातील मुंबई, पुण्यासह परराज्यात संशयितांच्या मागावर रवाना करण्यात आलेली आहे. यातील काही पथकांच्या हाती संशयितांची काही माहिती मिळाली असून त्यानुसार पोलिस तपासाच्या योग्य दिशेने जात असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. यावरून येत्या दोन दिवसात संशयित पोलिसांच्या ताब्यात असतील अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Crime News
कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना; लाच घेताना अख्खे कृषी अधिकारी कार्यालय अटकेत | Bribe Crime

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com