Nashik News : मोनिका राऊत नाशिकला नवीन पोलीस उपायुक्त | Monica Raut new Deputy Commissioner of Police for Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monica Raut new Deputy Commissioner of Police for Nashik

Nashik News : मोनिका राऊत नाशिकला नवीन पोलीस उपायुक्त

Nashik News : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात रिक्त असलेल्या पोलीस उपायुक्तपदी अकोल्याच्या अपर अधीक्षक मोनिका राऊत यांची बदली करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्यातील सहायक पोलीस आयुक्तपदाच्या अधिकार्यांच्या जम्बो बदल्या करण्यात आल्यानंतर आज विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, उपायुक्त, सहायक आयुक्त पदावरील अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (Monica Raut new Deputy Commissioner of Police for Nashik News)

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील दोन-अडीच महिन्यांपूर्वी उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांची बदली झाली, तेव्हापासून सदरचे पद रिक्त होते. या पदावर अकोल्याच्या अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांची वर्णी लागली आहे.

याशिवाय दोन दिवसांपूर्वी झालेल्या सहायक आयुक्त तथा उपविभागीय अधिकार्यांच्या करण्यात आलेल्या बदल्यातून नाशिक ग्रामीणमध्ये बदली झालेल्या काही अधिकार्यांच्या बदलीमध्ये फेरबदल करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

* बदल्या करण्यात आलेल्या अधिकारी (कंसात बदलीचे ठिकाण)

- अशोक मोराळे (विशेष पोलीस महानिरीक्षक रा.रा. पोलीस बल, पुणे)

- महेंद्र पंडीत (पोलीस अधीक्षक, कोल्हापूर)

- शैलेश बलकवडे (समादेशक, रा. रा. पोलीस बल, गट क्र.1 पुणे)

- योगेशकुमार गुप्ता (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड)

- मोनिका राऊत (पोलीस उपायुक्त, नाशिक शहर)

- अभय डोंगरे (अपर पोलीस अधीक्षक, अकोला)

- गुलाबराव वाघ (उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा)

* बदलीतील फेरबदल

- रणजित पाटील (उपविभागीय अधिकारी, मालेगाव छावणी - सहायक आयुक्त, संभाजीनगर)

- विक्रम कदम (उपविभागीय अधिकारी, कळवण - उपविभागीय अधिकारी, खालापूर, रायगड)

टॅग्स :NashikpoliceTransfers