नाशिक : मनपात ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्तच

प्रशासकीय राजवटीत आयुक्तांकडून मनुष्यबळांचे फेरनियोजन होण्याची गरज आहे
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationSakal

नाशिक - महापालिकेच्या कामकाजात अपुरे मनुष्यबळ हे महत्त्वाचे कारण आहे. संगणक क्रांतीच्या युगात कामकाजाचे स्वरूप बदलले आहे. संगणकीकरण, यांत्रिकीकरणासह ठेकेदारीमुळे कामाच्या ताणाची विभागणी झाली असली, तरी अजूनही अनेक महत्त्वाच्या विभागात पुरेसे कर्मचारी नाहीत, तर काही विभागात मात्र कामापेक्षा कर्मचारी अधिक आहेत. त्यामुळेच प्रशासकीय राजवटीत आयुक्तांकडून मनुष्यबळांचे फेरनियोजन होण्याची गरज आहे.

आकृतिबंधानुसार सरळ सेवेसाठी ६,३३३ पदे मंजूर असून, ३,७९० पदे कार्यरत आहे. तर २,५४३ पदे रिक्त आहेत. पदोन्नतीने होणाऱ्या कर्मचारी भरतीत १,३८४ पदे मंजूर असून, ९११ पदे कार्यरत आहेत. ४७३ जण रिक्त आहेत. वर्ग दोनमध्ये उपअभियंता पदवीधर, विद्युत पदवीधारक, असे दोन जादा लोक पदोन्नतीने कार्यरत आहेत. वर्ग तीनमध्ये ७ वायरमन, ३ पॉकलेन ऑपरेटर, एक्स रे टेक्निशियन, कुष्ठरोग तंत्रज्ञ यासह एकूण १२ पदे सरळसेवेने कार्यरत असून, ६ कनिष्ठ लिपिक, ९ कनिष्ठ अभियंता, १ शिफ्ट इंजिनियर, २ इलेक्ट्रिशियन, ६ मिस्तरी, दोन जेसीबी मशीन ऑपरेटर, १ सहाय्यक व्यवस्थापक, मलेरिया, कालिदास व्यवस्थापक, मलेरिया निरीक्षक या संवर्गात २८ पद पदोन्नतीने जादा कर्मचारी कार्यरत आहेत. ‘ड’ वर्गात ३ नाईक, दप्तरी, १ ऑईलमन, १ स्वच्छता मुकादम, ९ फिल्ड वर्कर यांसह १५ कर्मचारी सरळसेवेने जादा कर्मचारी कार्यरत आहेत.

फेस्टिव्हलविषयी...

महत्त्वाच्या अग्निशमन दल सक्षमच प्रमुखाविनाच

पाणीपुरवठ्यापेक्षा मलनिस्सारणाला अधिक कर्मचारी

करवसुली विभागाला अपुरे मनुष्यबळ

पदाधिकारी कार्यालयात मुबलक कर्मचारी

वर्ग मंजूर पद कार्यरत कर्मचारी रिक्त पद

अ २३१ ७१ १६०

ब ८४ ३६ ४८

क २५५८ १०१५ १४६३

ड २८५१ १६५९ ११९२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com