Nashik News | पाळीव श्‍वानावरून मायलेकांना बेदम मारहाण पंचवटीतील घटना : पाच संशयितांविरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News

Nashik News | पाळीव श्‍वानावरून मायलेकांना बेदम मारहाण; पंचवटीतील घटना

नाशिक : पाळीव श्‍वानाला (Dog) आवर म्हटल्याचा राग येऊन संशयितांनी मायलेकांना बेदम मारहाण केली. सदरील घटना पेठरोडवरील कर्णनगर परिसरातील अपार्टमेंटमध्ये घडली. (Mother and son brutally beaten up by people over Controversy of proper handle of dog nashik news)

याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारिका संदीप सुपेकर, सिंधूबाई शेवाळे, नंदा कोरडे, साई कोरडे, मयूर ज्ञानेश्वर जाधव अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रतिभा ज्ञानेश्‍वर शेलार (रा. मानस अपार्टमेंट, कर्णनगर, पेठरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची आई सिंधूबाई व भाऊ तुषार खैरनार हे दोघे बुधवारी (ता. २२) आपल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभे होते.

त्यावेळी पार्किंगमध्ये सारिका सुपेकर या आपल्या पाळीव श्‍वानाला घेऊन आल्या. यावेळी शेलार यांच्या आई सिंधूबाई यांनी सुपेकर यांना कुत्र्याला व्यवस्थित सांभाळण्याबाबत बोलल्या. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

या वादाचे पर्यावसन वाढत गेले. सुपेकर यांनी अन्य संशयितांना बोलावून घेत सिंधूबाईंशी वाद घालत असताना, तुषार खैरनार हे आपल्या आईच्या मदतीला धावून गेले.

त्यावेळी संतप्त संशयितांनी काहीतरी हत्याराने दोघा मायलेकांना मारहाण केली. या घटनेत दोघे मायलेक जखमी झाले असून सिंधूबाई यांच्या कानाला दुखापत होऊन कानातील सोन्याचा वेल गहाळ झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

टॅग्स :NashikBeatinganimalDog