esakal | महावितरणचा वसुलीचा धडाका; सुविधांच्या नावाने मात्र बोंब!
sakal

बोलून बातमी शोधा

MSEB

पिंपळगाव बसवंत येथे महावितरणकडून वसुलीचा धडाका सुरू आहे. मात्र, सुविधांच्या नावाने बोंब असल्याचा प्रकार आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनमानीपणा व उद्धटपणाचा फटका सध्या ग्राहक मुकाटपणे सहन करीत आहे.

महावितरणचा वसुलीचा धडाका; सुविधांच्या नावाने मात्र बोंब!

sakal_logo
By
रावसाहेब उगले

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : 'मिनी दुबई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथील महावितरणकडून वसुलीचा धडाका सुरूच आहे. मात्र, सुविधांच्या नावाने बोंब असल्याचा प्रकारही येथे सुरू आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मनमानीपणा व उद्धटपणाचा फटका सध्या ग्राहक मुकाटपणे सहन करीत आहे. वीजबिल भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्राहकांना मोठे दिव्य पार पाडावे लागत आहे. (mscdcl-recovered-bills-but-no-facility-to-customer- in-pimpalgaoan-basawant)

विज बिल भरूनही होतेय ग्राहकांची ससेहोलपट!

कोरोना (Corona virus) काळात महावितरणने सुरळीत वीजपुरवठा करून खऱ्या अर्थाने ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मान मिळविला. ग्राहकांनीही पै-पै जमा करून वीजबिले चुकती केली. दोन टप्प्यात बिले भरण्याची योजनाही काही महिन्यांपूर्वी महावितरणने आणली. या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व काही सुरळीत असतानाच कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) आली अन्‌ लॉकडाउन (Lockdown) झाले. कोरोनाशी सर्वांनीच दोन हात केले. दुसरी लाट ओसरत नाही तोच महावितरणने विजबिल वसुलीचा धडका सुरू केला. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम जोरात सुरू आहे. परंतु, थकबाकीची रक्कम भरल्यानंतर वीज जोडणी करण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उंबरखेड रोडवरील महावितण कार्यालयासमोर खासगी वीजबिल भरणा केंद्रात ग्राहक बिल अदा करतात. त्यानंतर बिल भरल्याची पावती पुन्हा महावितरणच्या अधिकाऱ्यांना दाखवून रि-कनेक्शनसाठी १२० रूपयांचे शुल्क भरावे लागते. मात्र, हे शुल्क भरण्यासाठी ग्राहकांनी ‘पिंपळगाव मर्चंट’ बँकेत पाठविले जाते. तेथे रि-कनेक्शनचे शुल्क अदा करून सदर पावती पुन्हा महावितरणच्या कार्यालयात दाखवावी लागते. यासाठी एक तासाहून अधिक वेळ ग्राहकांचा जातो. त्यानंतरही वीजपुरवठा जोडण्यासाठी ग्राहकांना लाईनमनच्या अक्षरश: विनवण्या कराव्या लागतात. एकीकडे ग्राहकांच्या मानगुटीवर बसून वीजबिल वसुली करणारे कर्मचारी बिल भरल्यानंतरही वीज सुरळीत करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा प्रत्यय ग्राहकांना येत आहे.

हेही वाचा: राजकीय नेत्यांमधले वाद खरे असतात का? - बच्चू कडू

माजी आमदारांकडून कानउघाडणी…

विजबिल भरणा केंद्रातच रि-कनेक्शन शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून का दिली जात नाही, असा जाब विचारत माजी आमदार अनिल कदम यांनी पिंपळगाव महावितरण कार्यालयातील अभियंता एकनाथ कापसे यांची चांगलीच कानउघाडणी केली. क्षुल्लक कारणासाठी ग्राहकांची ससेहोलपट थांबविण्याची तंबी या वेळी कदम यांनी दिली.

कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा…

थकीत विजबिलांचा भरणा केल्यानंतर वीज सुरळीत करण्यासाठी ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वसुलीचे काम सुरू आहे, नंतर बघू असे सांगत ग्राहकांना वेठीस धरले जाते. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही कुठलीच दखल घेतली जात नाही.

(mscdcl-recovered-bills-but-no-facility-to-customer- in-pimpalgaoan-basawant)

हेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव

loading image