नाशिकरोडच्या अतिक्रमणाकडे महापालिका आयुक्तांचे दुर्लक्ष

Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar
Nashik Municipal Commissioner Ramesh Pawaresakal

नाशिकरोड : नाशिक रोड परिसरातील अनेक मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण (Encroachment) वाढले आहे. सदर अतिक्रमणाकडे महापालिका (NMC) प्रशासनाचे दुर्लक्ष आहे की काय, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहे. ज्याप्रमाणे आयुक्तांनी नाशिक शहराच्या अनेक भागात फिरून अतिक्रमण मोहीम राबविली. अशी मोहीम नाशिक रोड परिसरात राबविण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहे. (Municipal Commissioners negligence towards encroachment of Nashik Road)

नाशिक रोडला प्रामुख्याने मुक्तिधाम, बिटको, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुक्तिधाम रोड आदी भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. या भागातील फुटपाथवर सुद्धा अतिक्रमणधारकांनी कब्जा केलेला आहे. त्यातच सध्या सोमानी उद्यानाचे प्रवेशद्वार बदलण्यात आले असल्याने येणाऱ्या- जाणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. या ठिकाणी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी गाड्या मोठ्या प्रमाणात पार्क केल्या जातात, परंतु त्याकडे कोणाचे लक्ष नसते. तसेच, बाजूला असलेल्या रस्त्यावर अनेक पावभाजी वाले व इतर खाद्यविक्रेते रस्त्यावरच टेबल खुर्च्या लावून आपला व्यवसाय करतात. त्यामुळे अर्धा रस्ता अडविला जातो. सायंकाळी सहानंतर या रस्त्याने जाणे व येणे म्हणजे एकप्रकारे अग्निपरीक्षा ठरली जाते.

Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar
सकाळ यिन समर यूथ समीट 2022 चा उद्‍घाटन सोहळा; पाहा Photos

मध्यंतरी मुक्तिधाम परिसरातील अतिक्रमण सर्वेक्षणाच्या नावाखाली काढून टाकण्यात आले होते, परंतु पुन्हा तीन दिवसानंतर जसाच्या तसे अतिक्रमण उभे राहिले. चार दिवसापूर्वीच आयुक्तांनी (NMC Commissioner) नाशिक रोड परिसराचा दौरा केला, परंतु अतिक्रमणाबाबत निर्णय घेण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अनेक फुटपाथ अतिक्रमण धारकांनी व्यापून टाकले आहे. सदर अतिक्रमण हटणार केव्हा, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहे.

Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar
ITI चे 3 विषयांचे एकत्रीकरण; ED, WCS आणि थेअरीची एकच 100 गुणांची परीक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com