nashik murder
nashik murderesakal

नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये एकाचा खून; दोघांना पकडले

नाशिक : सिडको भागातील सोनाली मटण भाकरी या हॉटेलमध्ये बसण्यावरून वाद होऊन एकाचा खून झाला. प्रसाद भालेराव (वय.२५) असे मृत युवकाचे नाव आहे. शहरात फक्त पार्सल सेवेला परवानगी असतांना सिडको आणि अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे हॉटेल सुरु असल्याचे या निमित्ताने उघड झाले. जेवणावरून झालेल्या वादातून ३ ते ४ जणांनी तरुणाच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करून खून केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अंबड पोलीसांनी रात्री दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना सिडकोतील स्टेट बॅंकेजवळील सोनाली मटण भाकरी हॉटेलमध्ये रात्री दहाच्या सुमारास घडली. (Murder-of-young-boy-in-sonali-mutton-bhakri-hotel-crime-news-jpd93)

प्रसादच्या डोक्यात फरशीच्या तुकड्यांनी हल्ला

संचारबंदी सुरू असतानाही नाशिकमध्ये रात्रीच्या सुमारास काही हॉटेल्स सुरू असतात. प्रसाद भालेराव आणि साथीदार तेथे जेवायला आले असताना जेवणावरून खटके उडाले आणि भांडण झाले. त्याचवेळी प्रसादच्या डोक्यात फरशीच्या तुकड्यांनी हल्ला केला. आणि त्याच वेळी प्रसाद खाली कोसळली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. घटनेची माहिती मिळताच प्रसादला उपचारासाठी शासकिय रूग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र त्याच वेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. याचा अधिक तपास पोलीस करत असून हल्लेखोरांपैकी दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

-

nashik murder
नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : आणखी 7 जण निलंबित
nashik murder
नाशिक, इगतपुरीत ‘CBI’चे छापे; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com