Nashik Crime : धोंडगव्हाणवाडीत तरुणाचा खून | Murder of youth in Dhondgavanwadi nashik crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

Nashik Crime : धोंडगव्हाणवाडीत तरुणाचा खून

Nashik Crime : वडनेर भैरव (ता.चांदवड) येथून जवळच असलेल्या धोंडगव्हाणवाडी येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. सचिन बहादूरसिंग परदेशी (वय ३५, रा. खुटवडबाबा वस्ती, चांदवड) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Murder of youth in Dhondgavanwadi nashik crime news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रविवारी (ता.४) सचिन हा सकाळी झाडे तोडण्यासाठी जात असताना स्वप्नील कडाळे (वय ३१, रा. खुटवड बाबा वस्ती) यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून त्याच्या हातातून कुऱ्हाडीच्या दांड्याने सचिनच्या डोक्यात जोराचा फटका मारला.

यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडनेर भैरव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित स्वप्नील कडाळे यास अटक करण्यात आली आहे.