Nashik News : नाशिक गाठण्यासाठी नांदगाकरांना अजूनही लागतोय सव्वातीन तासाचा वेळ!

ST Bus
ST Busesakal

Nashik News : ‘वाट पाहीन पण एसटीने जाईल’ असा आपल्या लाडक्या लालपरीवर गाढा विश्वास बाळगणाऱ्या नांदगावकरांना मात्र वर्षानुवर्षे नाशिकला जाण्यासाठी नांदगाव चांदवड दरम्यान सिमेंट कॉंक्रिटीकरण झालेला नवा महामार्ग वापरात येवून देखील अजूनही सव्वातीन तासाहून अधिकचा वेळ लागत असल्याने आता हा प्रवास कंटाळवाणा वाटू लागला आहे.

महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या मार्गावर सव्वा तीन तासाचा कालावधीत घट कधी होणार याकडे सर्व नांदगावकरांचे लक्ष लागून आहे. (Nandgaon people still needs three half hours to reach msrtc st bus Nashik News)

जिल्ह्याच्या टोकाला शंभर किमी अंतरावर असलेल्या नांदगावकरांना नाशिक गाठण्यासाठी एसटीने साडेतीन तासाचा लागणार अवधी अजूनही तसाच आहे. यात महामार्गामुळे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी घटला असूनही मात्र हा तीन तासांचा प्रवास नांदगावकराच्या नशिबी जैसे थे आहे.

एसटी आगाराला सर्वाधिक उत्पन्न याच मार्गावर मिळत असते. सध्या लग्नसराई व उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने दैनंदिन सहा लाखाचे उत्पन्न मिळत आहे. रेल्वेच्या वाढत्या गर्दीमुळे नांदगाव ते नाशिक दरम्यान नांदगाव आगाराच्या बसेस सध्या जोरात धावत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ST Bus
Water Crisis : लासलगावसह 16 गाव पाणीयोजनेचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित

चांदवड ते ओझर पर्यंत लहान मोठे सर्वच थांब्यावर फक्त नांदगाव आगाराचीच थांबत असते. नांदगाव आगारातून नाशिकसाठी धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो.

पहाटे ५ वाजेपासून ते सकाळी ८:३० पर्यंत दर अर्धा तासाच्या अंतरात बस धावत असून सकाळी ८:३० नंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत दर १तासाने बस धावत आहे. नांदगाव आगारातून दिवसभरात साधारणतः सतरा बसेस नाशिक मार्गावर धावत आहे.

ST Bus
Unique Wedding : चट मंगनी पट शादी! ओझरच्या जंजाळे- अभंग परिवाराचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com