Narhari Zirwal : आमदार अपात्रतेचा मी घेतलेला निर्णय योग्य : नरहरी झिरवाळ | Narhari Zirwal statement My decision of MLA disqualification correct nashik political news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narhari Zirwal

Shiv Sena Case : 'विधानसभाध्यक्षांना नव्हे मला अधिकार! आमदार अपात्रतेचा मी घेतलेला निर्णय योग्य' नरहरी झिरवळ

Narhari Zirwal : राज्यातील सत्तासंघर्षाबद्दल गुरुवारी (ता. ११) सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्याचअनुषंगाने आमदार अपात्रतेचा माझा निर्णय कुठल्या आकसापोटी नाही, तर घटनेनुसार दिला.

त्यामुळे न्यायदेवता माझ्या निर्णयाचा विचार करेल, असा विश्‍वास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज येथे व्यक्त केला. (Narhari Zirwal statement My decision of MLA disqualification correct nashik political news)

तसेच निर्णय घ्यायची वेळ आल्यास तो विषय माझ्याकडे येईल. तत्कालीन अध्यक्ष असताना मी दिलेला निर्णय असल्याने हा विषय माझ्याकडे येईल, असे सांगून श्री. झिरवाळ म्हणाले, की मी निर्णय दिलेला असताना आताचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अध्यक्ष नव्हते.

त्याठिकाणी मी होतो. मी घेतलेल्या निर्णयाला त्यांनी हरकत घेतल्याने प्रकरण न्यायालयात गेले. शिवाय माझ्यावर अविश्वास आणला, परंतु तो सिद्ध झाला नाही. म्हणून तो प्रश्न येणार नाही.

न्यायालयाचा निकाल महाराष्ट्रापुरता नव्हे, तर देशावर त्याचा परिणाम होईल. सोळा आमदार अपात्र ठरल्यावर सरकारला धोका असून मुख्यमंत्री अपात्र ठरल्यावर सरकार पडणार. त्यानंतर कोणाचे सरकार येणार हा भाग वेगळा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उर्वरित २४ आमदारांना निर्णय लागू होईल काय? यासंबंधाने श्री. झिरवाळ यांनी अद्याप त्याबाबत सांगता येत नसून निर्णय १६ आमदारांना लागू होईल, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, की जनता आणि घटनेचे महत्त्व यासाठी निकाल महत्त्वाचा आहे.

निर्णय आल्यावर महाविकास आघाडी म्हणून निर्णय होईल. मात्र सध्या काही हालचाली नाही. त्याचबरोबर १६ आमदार अपात्र न झाल्यास कुणीही कोणत्याही बाजूस जाईल आणि स्वतंत्र गट स्थापन करेल. सध्यस्थितीत जनतेमध्ये सत्तासंघर्षाचा निकाल लागला पाहिजे, अशी भावना आहे.