रस्त्याची गुणवत्ता बिघडवाल तर गाठ माझ्याशी - नरहरी झिरवाळ

narhari zirwal
narhari zirwalesakal

लखमापूर (जि. नाशिक) : कोरोनाच्या (Corona) महामारीतून सावरत महत्वाच्या विकास कामांना सरकार निधी उपलब्ध करून देत आहे. मात्र काही ठेकेदार कामाचा दर्जा, गुणवत्ता व मुदतीत काम न होण्याचे प्रकार वाढत आहे. असे झाल्यास गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दमवजा इशारा राज्याचे प्रभारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी येथे रस्त्याच्या भूमिपूजनावेळी दिला. राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे अध्यक्षस्थानी होते.

अधिकाऱ्यांनो, तुम्हीही...

श्री. झिरवाळ म्हणाले, मी जेव्हढ्या मोठ्या पदावर गेलो तशा मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, यामुळे नुसती कामे न करता त्यात गुणवत्तेला प्राध्यान्य देणार असल्याने ठेकेदाराकडून चांगल्या गुणवत्तेची कामे न झाल्यास गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल. अधिकाऱ्यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून नागरिकांनी विकासाची कामे खराब होत असल्यास तत्काळ तक्रार करावी असेही श्री. झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

narhari zirwal
नाशिक : भुजबळांच्या वाटेत निषेधाच्या रांगोळ्या

जनतेनेही लक्ष द्यावे

श्रीराम शेटे म्हणाले, कामात गुणवत्ता नसेल तर कितीही कामे केली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. उलट जनतेचा रोष व शासनाचा पैसा वाया जाईल. यामुळे शासन व जनता यांनी एकत्र येऊन विकास कामांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यात विकासाची गती वाढत असताना गरजा व अपेक्षा वाढल्या आहे. त्यापूर्ण करण्यासाठी शासन पातळीवर झिरवाळ नक्कीच प्रयत्नशील राहतील. बाळासाहेब जाधव, विश्वास देशमुख, विश्वनाथ देशमुख, बाळासाहेब देशमुख, सरपंच सौ. देशमुख, उपसरपंच नानासाहेब देशमुख ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते.

narhari zirwal
नाशिक : भारूडाच्या माध्यमातून कोरोना जनजागृती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com