नारोशंकराची घंटा : सायबर कॅफे अन् कॉफी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Couple Meet

नारोशंकराची घंटा : सायबर कॅफे अन् कॉफी

लग्न ठरलं की तिथूनच नवलाईचे नऊ दिवस सुरु होतात. अर्थात ज्याचं लग्न झालय त्यांनाच हे माहिती असेल बर का। ज्याच अजून व्हायचं बाकी आहे, त्यांनी या नवलाईच्या भानगडीत न पडलेलं बरं.

नंतर म्हणू नका अगोदर का नाही सांगितलं. तर आपण मुळ मुद्याकडे येऊ, संगणक क्षेत्रातील सर्वोच्च पदवी घेतलेल्या एका मुलीला प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तिच्या मनासारखा मुलगा भेटतो. (Naroshankarachi ghanta Cyber ​​Cafe and Coffee nashik news)

दोघांचे शिक्षणच काय तर वय देखील जवळपास सारखेच आहे. आपल्याला आपल्याच क्षेत्रातील आवडीचा जोडीदार मिळाला म्हटल्यावर दोघेही फूल फॉर्ममध्ये असतात. साखरपुडा आटोपला म्हणजे ‘बुकिंग’ झाले.

त्यामुळे गाठीभेटींना आता काही फारशी अडचण नाही. थोडीफार आचारसंहिता पाळावी लागेल इतकेच. पण थोड्या दिवसांसाठी घाई कशाला म्हणून हे नवदाम्पत्यही तेवढी घाई करणार नाही, याची जणू खात्रीच.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

एक दिवस दोघांनी भेटायचं ठरवलं. मुलीला घरापासून दूर घेऊन गेलो तर आचारसंहितेचा भंग होईल, म्हणून तिच्या घराजवळच एक कॅफेत भेट ठरते. निर्धारित वेळेत मुलगी नियोजित ठिकाणी पोहचते. मुलगा थोडा उशिरा येणार असतो.

तर तो ठिकाण नेमकं कुठे आहे म्हणून फोन करतो. तर ती सांगते, अमुक ठिकाणी एक सायबर कॅफे आहे, त्याच्याबाहेर मी उभी आहे. बराच वेळ शोधल्यानंतर या भाऊच्या लक्षात येतं की, ती सायबर कॅफे बाहेर उभी आहे पण आपण ठरवलेलं ठिकाण कॅफे आहे. दोघेही संगणक क्षेत्रातले असल्यामुळे आपली चुक लक्षात येते आणि सायबर ऐवजी फक्त कॅफेत पोहोचतात.

टॅग्स :Nashikcyber newsComedy