नारोशंकराची घंटा : साडेआठचा अलार्म ‘नेहमीचा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Watch

नारोशंकराची घंटा : साडेआठचा अलार्म ‘नेहमीचा’

काही व्यक्तींना अलार्म वाजल्याशिवाय जागच येत नाही. त्यात काही महाभाग तर सूर्य उगवल्याशिवाय झोपेतून उठत नाहीत. जणू काही 'सूर्य'वंशी म्हणून त्यांना उपाधीच मिळाली आहे.

अशाच एक शिक्षिका ज्यांना सकाळी आठला उठायचे म्हटले तरी मोबाईलमध्ये अलार्म सेट करावा लागतो. रविवार सोडला तर आठवड्याचे सहा दिवसांसाठी त्यांचा आलार्म फिक्स असतो. पण गेल्या रविवारी शिवजयंती असल्याने त्यांना शाळेत सकाळी साडेसातला बोलवलेले असते. (naroshankarachi ghanta sakal special eight thirty alarm usual nashik news)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यामुळे मॅडमनी रात्री झोपण्यापूर्वी अलार्म सेट केला. रात्री निर्धास्तपणे झोपल्या आणि सकाळी नेहमीप्रमाणे उठल्या. खिडकीतून बाहेर बघतात तर 'सूर्य'देव प्रकट झालेले. सताड उजेड पडलेला, तेव्हा यांनी घड्याळ बघितले तर आठ वाजत आले होते.

घड्याळात आठ वाजत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते. आता शाळेत मुख्याध्यापकांचे बोलणे खावे लागतील म्हणून पटापट आवरतात आणि शाळेत जायला निघतात. जात असताना रस्त्यात यांच्या मोबाईलचा अलार्म वाजतो. तेव्हा त्या बघतात तर काय? आपण नेहमीप्रमाणे साडेआठचाच अलार्म सेट केला होता. फक्त त्यात रविवार अॅड केला इतकेच, आता बोला.

टॅग्स :NashikTime